अहमदनगर – २६ वर्षांनतर माजी विद्यार्थी एकत्र

नगर –  पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील श्री आनंद विद्यालयात येथे सन १९९७ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांची गेटपासून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढली. वंदना तरवडे, मीना पोटे, प्रेमलता, रेखा खाडे व शीला आव्हाड यांनी शिक्षकाचे औक्षण व पाद्यपूजन केले. आपल्याला सोडून गेलेले काही शिक्षक व वर्गमित्र यांना भावपूर्ण आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली.

उपस्थितांचे स्वागत संदीप जायभाय, आदीनाथ दानवे यांनी केले.अध्यक्षस्थानी धायतडक होते. शालेय जीवनातील आठवणींना उजाळा मिळाला. आपले वय, पद, प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून एकत्र आलेल्या सर्व मित्रांना लहानपणात हरववल्याचा अनुभव मिळाला. प्राचार्य खेडकर, गांधी, सारुख, भिंगारकर, गादिया, ढाकणे, गिते, तरवडे गुरूजी, फकीर, देवगुणे मामा, बाबु काका उपस्थित होते. गुरुवर्यांना भगवत गीता देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कमलेश गुगळे व महादेव कुदळे यांच्यासह मित्रमंडळीनी केले होते. प्रास्ताविक महादेव शिरसाठ, सूत्रसंचालन शहादेव आव्हाड व आभार प्रदर्शन विनोद दानवे यांनी केले. शेवटी सर्वांनी आनंद तीर्थावर जाउन आचार्य आनंदॠषी यांचे आशिर्वाद घेतले.