अहमदनगर – मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण

नगर -मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणी करिता सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नगर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला नगर शहरासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरक्षणाला शनिवारी पाठिंबा दिला. आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालय समोर साखळी उपोषण करण्यात येत आहे.

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शीला शिंदे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमार वाकळे, विनीत पाऊलबुधे, बाळासाहेब पवार, शिवसेनेचे शहप्रमुख संभाजी कदम, भाजपचे नगरसेवक रवींद्र बारस्कर, अविनाश घुले आदी नगरसेवकांनी शनिवारी दुपारी भेट देवून मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. तसेच तालुक्‍यातील तरूण अबला वृद्ध आणि महिलाही लहान मुलांसह या आंदोलनात सहभागी झाले. नगर तहसील समोर गेल्या चार दिवसांपासून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.