अहमदनगर – राहुरीत आज चक्काजाम आंदोलन

राहुरी – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यां संदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली दि. १२ डिसेंबर रोजी राहुरी येथे नगर- मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय सोनवणे व नायब तहसीलदार पूनम दंडिले यांना निवेदन देण्यात आले.

सध्या राज्य व केंद्र शासन राबवत असलेल्या कृषि विरोधी धोरणांमुळे शेतकरी पूर्णतः अडचणीत आलेला आहे. आधीच आसमानी व आर्थिक संकटामुळे हतबल झालेला शेतकरी शासनाच्या जुलमी व कृषि विरोधी निर्णयांमुळे अधिक आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचत चाललेला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यां संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता राहुरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलन प्रसंगी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी केले.