अहमदनगर – जुन्या मंगळवार बाजाराची दयनीय अवस्था; ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर!

नगर  – जुना मंगळवार बाजार आणि शनिचौक रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रस्ता दोन वर्षाच्या आत खराब झाला असून ड्रेनेजचे काम निकृष्ट झाले आहे. रस्ता मंजूर असून देखील दुरुस्त झालेला नाही. या रस्त्यावरुन शाळकरी मुलांच्या जाण्याचे प्रमाण अधिक आहे.

सध्या साथीच्या आजारांचा प्रादुभाव सुरु आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. याची जबाबदारी मनपा प्रशासन स्वीकारणार का? संबंधित रस्त्याचे काम मंजूर करताना रस्त्याच्या दर्जाची हमी असेल तर हा सत्ता पुन्हा दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी करून रस्त्याचे जे काम आहे ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहे. यातून परिसरातील नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे.