अहमदनगर – कार्यालयात चॉपरने केला वारआरटीओ कर्मचाऱ्यावर हल्ला

नगर – जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात काम करून देत नाही म्हणून एजंटने थेट प्रादेशिक परिवरहन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर खुनी हल्ला केला आहे. कार्यालयात घुसून या एजंटने कर्मचाऱ्यावर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाला एजंटंचा विळखा पडला आहे. दिवसेंदिवस त्यांची दादागिरी समोर येतांना दिसत आहे. वाहनावरील बोजा कमी करून ट्रान्स्फर करून दे अशी मागणी करत आरटीओ कर्मचाऱ्यांवर जमावाने खुनी हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी (दि.23) दुपारी घडला. एजंटगिरी करणाऱ्या हुजेफ युनुस जमादार यांच्यासह 15 जणांनी कनिष्ठ लिपीक सुनील शेवरे यांना मारहाण केली.
या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हुजेफ यूनुस जमादार याला ताब्यात घेतले आहे.

तर इतर इतर आरोपींचा शोध सध्या श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.श्रीरामपूर येथील आरटीओ कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या हुजेफ युनुस जमादार याने आणि त्याच्या भावाने बनावट कागदपत्रे तयार करून कनिष्ठ लिपिक सुनील शेवरे यांना जबरदस्तीने सही करून दोन्ही भावांनी दमदाटी केली आणि मारहाण केली.