Asthma Patients : दमा असलेल्या रुग्णांनी चुकूनही ‘AC’मध्ये बसू नका; होईल मोठा धोका, अशी घ्या काळजी….

Air Conditioner | Asthma Patients । उन्हाळ्यात एअर कंडिशनर म्हणजेच ‘एसी’चा वापर वाढत आहे. घरापासून ऑफिसपर्यंत बहुतांश वेळ आपण एसीमध्येच असतोच. मात्र, अश्या परिस्थितीत दम्याच्या रुग्णांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे, कारण एसीची हवा त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

जवळपास असलेले धुळीचे कण या हवेसह शरीरात प्रवेश करतात आणि समस्या निर्माण करतात. हे कण श्वासोच्छ्वासाद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतात आणि त्यामुळे हल्ला देखील होऊ शकतो. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी एसी मध्ये बसण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि निष्काळजीपणा टाळावा. । Air Conditioner | Asthma Patients

अस्थमाच्या रुग्णांसाठी खबरदारी –
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एसीमध्ये बसण्यापूर्वी अस्थमाच्या रुग्णांनी एसी व्यवस्थित साफ झाला आहे? की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. एसी गलिच्छ असेल तर त्यातील धुळीचे कण हवेसोबत शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे एसीच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. हवामानात बदल होताच दम्याच्या रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबत सजग व्हायला हवे. औषधे वेळेवर घ्यावीत. । Air Conditioner | Asthma Patients

एसीच्या धुळीचे कण कसे टाळावेत –
1. एसीची योग्य स्वच्छता ठेवा.
2. एसी स्वच्छ ठेवण्यासाठी, त्याचे एअर फिल्टर योग्यरित्या स्वच्छ करा किंवा बदला.
3. AC चे तापमान 25 अंशाच्या आसपास ठेवा.
4. तुम्ही नवीन एसी घेणार असाल तर एअर प्युरिफायर असलेला एसीच घ्या.
5. दम्याचे रुग्ण एसीमध्ये बराच वेळ बसले असतील तर मास्क लावून बसा आणि सोबत इनहेलर ठेवा.

दम्याचे कारण –
दमा हा एक धोकादायक आजार आहे. ज्यामध्ये श्वसनमार्गाला सूज येते आणि फुफ्फुसांनाही संसर्ग होतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. यासोबतच श्वास घेताना घरघराचा आवाज येतो आणि सतत खोकल्याची समस्या कायम राहते. काही रुग्णांना कोरड्या खोकल्याचा त्रास होतो आणि झोपेच्या वेळी जास्त खोकला येतो. । Air Conditioner | Asthma Patients

दम्याच्या रुग्णांनी काय करावे?
1. धूळ, माती आणि धुराचा संपर्क टाळा किंवा पूर्ण खबरदारी घ्या.
2. दम्याच्या रुग्णांनी बाहेर जाताना मास्क घालायला विसरू नये.
3. तुमची औषधे वेळेवर घ्या आणि तुमच्या आहाराची योग्य काळजी घ्या.