एअर इंडिया करणार इतिहासातील सर्वात मोठा करार; कंपनी अमेरिकेकडून खरेदी करणार 840 विमाने

नवी दिल्ली :  एअर  इंडीआयकडून विमान कंपन्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा करार करण्यात येणार आहे. टाटाच्या मालिकी असणारी एअर इंडिया कंपनी अमेरिकेकडून तब्बल 840 विमाने खरेदी करणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे.  सुरुवातीला कंपनी अमेरिकेकडून 470 बोईंग विमाने खरेदी करणार अशी माहिती, याआधी समोर आली होती. मात्र आता एअर इंडियाच्या  अधिकाऱ्यांनी बोईंग विमानासंदर्भातील कराराबाबत मोठी अपडेट दिली आहे. यानुसार, एअर इंडिय एकूण 840 एअरबस आणि बोईंग विमानं खरेदी करणार आहे.

अमेरिका आणि एअर इंडिया यांच्यातील हा करार विमान कंपन्यांच्या इतिहासातील मोठा करार ठरणार आहे. एअर इंडियाचे चीफ कमर्शियल आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर निपुण अग्रवाल यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये याविषयीची माहिती पोस्ट केली आहे.  यात  “एअर इंडियाच्या कराराबद्दल संपूर्ण जगभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा प्रतिसाद पाहता आम्ही कृतज्ञ आहोत.” असे त्यांनी म्हटले आहे. तर निपुण अग्रवाल यांनी पुढे म्हटले कि, एअर इंडियाच्या विमान खरेदीचा नवीन करार हा सुमारे दोन वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या खाजगीकरणापासून सुरू झालेल्या अद्भुत प्रवासाचा एक भाग आहे. येत्या दशकात एअर इंडियाने 470 हलकी विमानं आणि 370 विमानं खरेदी करण्यासाठी बोईंग आणि एअरबसशी करार केला असल्याचे त्यांनी सांगितले  आहे.

एअर इंडिया फ्रेंच आणि अमेरिकन कंपनी एअरबस आणि बोईंगकडून 470 विमाने खरेदी करणार आहे, अशी बातमी 14 फेब्रुवारी रोजी समोर आली होती. यामध्ये 250 एअरबस विमानं आणि 220 बोईंग विमानांचा समावेश होता. तसेच या करारामध्ये अतिरिक्त 370 विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे.

या करारामुळे टाटाच्या मालकीच्या एअर इंडियाच्या ताफ्यात 40 पूर्ण आकाराची A350 आणि 210 लहान आकाराची विमाने समाविष्ट होतील. यामध्ये एअरबस कंपनीच्या A-320/321, NEO/XLR आणि A350-900/1000 या विमानांचा समावेश आहे. याशिवाय, 190 737-MAX, 20 787 आणि दहा 777 या बोईंग विमानांचा समावेश आहे. या करारानंतर एअर इंडियाच्या ताफ्यात B737-800 विमानाचाही समावेश होईल.