अजय देवगणने खरेदी केले मुंबईत 45 कोटींचे ऑफिस

मुंबई –  बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात नवीन ऑफिस विकत घेतले आहे. 5 युनिट ऑफिस असलेल्या या मालमत्तेची किंमत 45 कोटी रुपये आहे.  रिपोर्ट्सनुसार, ओशिवरा येथील सिग्नेचर इमारतीच्या 16व्या आणि 17व्या मजल्यावर खरेदी केलेल्या या कार्यालयाची एकूण जागा 13,293 चौरस फूट आहे. मात्र अजयने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

जिथे 16व्या मजल्यावर ऑफिसचे 3 युनिट्स आहेत आणि त्यांची किंमत 30.35 कोटी रुपये आहे. त्यासाठी १.८२ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. 17 व्या मजल्यावर या कार्यालयाचे दोन युनिट असून, त्याची किंमत 14.74 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी 88.44 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, दोन वर्षांपूर्वी अजयने मुंबईतील जुहू येथे एक बंगला खरेदी केला होता. ४७४.४ स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या बंगल्याची किंमत ४७.५ कोटी रुपये होती.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अजयचा ‘भोला’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याने नुकतेच अभिषेक कपूरच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. यात त्याच्यासोबत पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी दिसणार आहे. याशिवाय अजय ‘मैदान’ चित्रपटासाठी योग्य रिलीझ डेटच्या शोधात आहे.