Ajit Pawar : “80 वय झालं तरी माणूस थांबत नाही” ; अजित पवारांचा शरद पवारांना टोला

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी केलेल्या टीकेनंतर काका-पुतण्यामधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी,”वय झाल्यानंतर आपण थांबायचे असते. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. 80 वय झालं तरी माणूस थांबत नाही”, असा टोला शरद पवार यांना लगावला आहे.

कल्याणमध्ये अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार होते. यावेळी त्यांनी, “बहुजनांच्या कल्याणासाठी आपण सत्तेत गेलो आहोत. वय झाल्यानंतर आपण थांबयच असतं. काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. काहीजण सत्तरी झाली की थांबतात. काहीजण वय 75 झाले की थांबतात. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. आम्ही देखील 5 वेळेस राज्याचे उपमुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेतेमंडळी चांगल्या प्रकारे काम करत आहे, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

त्यासोबतचत शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मिायांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्याच मार्गावर आपल्याला पुढे जायचे आहे. सर्व धर्मियांच्या सणांचा आपण आदर केला पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरु आहे. कधीही कोणाला वाऱ्यावर सोडायचे नाही. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायचे आहे. राज्यातील जनता आपल्या पाठीशी उभी राहणार आहे, असा दावाही अजित पवार यांनी केला.

ग्रामीण भागावर होणाऱ्या अन्यायावर अजित पवारांनी भाष्य केले. शहरी भागाला पाणीपुरवठा करताना ग्रामीण भागावर अन्याय होणार नाही. याची आम्ही काळजी घेत आहोत. वंदे भारत ट्रेन मुंबई ते नाशिक सुरु केली. समृद्धी महामार्ग देखील सुरु केलेला आहे. तरुण -तरुणींच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतोय, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.