अजित पवारांच्या मातोश्री विठुरायाच्या दर्शनाला; मुलगा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया देत म्हणाल्या,”अजित..”

पंढरपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली. एवढे नाही तर राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अनेक नेत्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र आज अजित पवारांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांच्या आई आज पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आल्या होत्या यावेळी मुलगा उपमुख्यमंत्री झाल्याने विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. अजित पवार राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर आशाताई पवार विठ्ठलाच्या चरणी नसमस्तक झाल्या आहेत. तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले यांचा आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया आशाताई पवार यांनी दिली आहे.

अजित पवारांनी काकांच्या म्हणजेच शरद पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी आमदारांसह बंडखोरी केली आणि राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या आशाताई पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले याचा आनंद झाला म्हणून विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्याचे त्यांनी यावेळी म्हंटले. अजित पवारांच्या आई राजकारणापासून दूर आहेत. अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात त्यांच्या आजी-आजोबांच्या घरी झाला. अजित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत.