अखिलेश यादवाचं दमदार कमबॅक; मतांमध्ये 10 टक्क्यांनी भरघोस वाढ

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. या ट्रेंडमध्ये भाजपने 250 चा टप्पा ओलांडला आहे. भाजपचे स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. मात्र त्याचवेळी अखिलेस यांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे.

आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत भाजप 271 जागांवर तर सपा 127 जागांवर आघाडीवर होतं. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सज्ज झालं आहे. मात्र समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाची कामगिरी निश्चितच सुधारली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या विधानसभेला सपाच्या जागा जवळपास तिपटीने वाढल्या आहेत. याशिवाय पक्षाच्या मतदार संख्येतही १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे परभाव असला तरी अखिलेशसाठी हे पुनरागमन म्हणावं लागेल.

दुसरीकडे उत्तर प्रदेशात सपा एकमेव पक्ष आहे, ज्यांच्या जागा वाढल्या. तर बहुमत मिळवणाऱ्या भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 325 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप 271 जागांवर आघाडीवर आहे.