जलसा 2.0 गाण्यात अक्षय कुमार – परिणीती चोप्राची दिसली जबरदस्त केमिस्ट्री

entertainment news  – अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘मिशन रानीगंज’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या दमदार टीझरनंतर आता त्याचे पहिले गाणे जलसा २.० रिलीज करण्यात आले आहे.

 

 

टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित ‘मिशन राणीगंज – द ग्रेट भारत बचाव’ हा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या टीझरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता वाढली.

नुकतेच मिशन राणीगंजचे जलसा 2.0 हे गाणे रिलीज झाले. गाण्यादरम्यान अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा जबरदस्त डान्स करताना दिसतात. दोघांची केमिस्ट्री मस्त दिसतोय. त्याचबरोबर गाण्यात अक्षय कुमार जसवंत गिलच्या लूकमध्ये दिसतोय. यावेळी त्याने कुर्ता पायजमा आणि पगडी परिधान केलीय. तर परिणीती चोप्रा सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

यासोबतच अक्षय कुमार गाण्यादरम्यान भांगडा करताना दिसत आहे. त्याचबरोबर परिणीती अक्षयला पूर्ण पाठिंबा देताना दिसत आहे. यासोबतच यूजर्सना हे गाणे खूप आवडले आहे आणि ते यावर सतत कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले,’उत्तम संगीत आणि बीट्ससह दमदार गाणे.’ संपूर्ण गाण्यात अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांच्यातील जबरदस्त केमिस्ट्री दिसत आहे.