टाईमच्या मुखपृष्ठावर ऍलन मस्क

न्यूयॉर्क – टेस्ला व स्पेस एक्‍स या कंपनीचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ऍलन मस्क यांची टाईम या विख्यात नियतकालिकाने 2021 च्या जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून निवड केली आहे.

तब्बल 250 अब्ज डॉलरची मालमत्ता असलेल्या मस्क यांच्याकडे स्वतःचे घर नाही. त्यातच मस्क समाजोपयोगी कामासाठी आपल्याकडील पैसा खर्च करू लागले आहेत. ते अवकाशात उपग्रह पाठवतात. सूर्याच्या उर्जेचा माणसासाठी कसा वापर करता येईल याबद्दल काम करतात.

चालक विरहीत इलेक्‍ट्रीक कार तयार करतात. जगातील इलेक्‍ट्रीक कारच्या बाजारातच मस्क यांच्या कारचा वाटा दोन तृतीयांश आहे. बिटकॉईनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर ते अहोरात्र काम करतात आणि त्यांच्या एका ट्‌विटमुळे शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कमी जास्त होतात.

टेस्ला कंपनीचे बाजार मूल्य काही वर्षात 1 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. मस्क यांच्या कृती आणि विचाराचा आपल्या पिढीवर बराच परिणाम झाला असल्याचे टाईम नियतकालिकाने म्हटले आहे.