आळंदी: करोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थांना शिक्षकांकडून 50 हजारांची मदत

आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाद्वारे संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून जमा केलेली रोख रक्कम  अनाथाश्रम, वृध्दाश्रम, आदिवासी / ठाकर वस्ती, नैसर्गिक आपत्तीच्या झालेल्या ठिकाणी पोहचविली जाते. या वर्षी जवळपास 50 हजार रुपयाची रक्कम कोरोना जागतिक संकटाच्या काळात विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी आपले पालक (आई, वडील अथवा दोघेही) कोरोना संसर्गामुळे अथवा अन्य आजाराने गमावले अशा विद्यार्थ्यांना ही रक्कम मदत स्वरूपात  देण्यात आली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे सचिव अजित वडगावकर, दिपक मुंगसे, प्रदीप काळे, अल्लाबक्ष मुलाणी यांनी दानाची गरज, दान कुठे करावे, दानाचे महत्व सांगून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ‘पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे यांचा संस्था व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संस्‍थेचे सचिव अजित वडगांवकर, विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अशोक बनकर, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले, सांस्कृतिक समिती प्रमुख संजय उदमले, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, विद्यार्थी सहाय्यक समिती प्रमुख विद्या नवले, गुट्टे सर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या नवले यांनी केले. तसेच सूत्रसंचालन हेमांगी कारंजकर यांनी केले व उपस्थितांचे आभार पूजा भोसले यांनी व्यक्त केले.