अमेरिकेकडून जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा; जवाहिरीच्या खात्म्यानंतर दहशतवादी हल्ल्यांची शक्‍यता

वॉशिंग्टन – अल-कायदाचा म्होरक्‍या आयमान अल जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून जगभरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता गृहित धरून अमेरिकेने जगभरातील प्रवाशांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. अल कायदाचे समर्थक अमेरिकेच्या नागरिकांना लक्ष्य करण्याची शक्‍यता असल्याचे अमेरिकेने जारी केलेल्या या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे.

जवाहिरी हा न्यूयॉर्कवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यामागील सूत्रधार होता. त्या भीषण हल्ल्यानंतर जवाहिरीने भारतीय उपखंडात अल-कायदाशी संबंधित गटांचे जाळेही उभे केले होते. काबूलमधील आलिशान वसाहतीतील घरावर अमेरिकेच्या “सीआयए’ने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तो शनिवारी ठार झाला. जवाहिरी ठार झाल्यानंतर अल-कायदाचे समर्थक आणि या संघटनेशी संबंधित अन्य संघटनांकडून अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर हल्ले होण्याची शक्‍यता आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे.

नॅशनल हेराल्डच्या इमारतीतील यंग इंडियाचे कार्यालय “ईडी”ने केले सील

अमेरिकेच्या नागरिकांनी परदेशात प्रवास करताना अत्युच्च सतर्कता बाळगावी, असे या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आंदोलन, दहशतवादी हल्ले आणि अमेरिकेच्या नागरिकांवर हल्ले होण्याची शक्‍यता आहे, अशा देशांबाबतही अमेरिकेने चिंता व्यक्‍त केली आहे. सशस्त्र संघर्षाची पार्श्‍वभूमी असलेल्या देशांमध्ये प्रवास करू नये. स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवावे आणि आपल्या जवळच्या अमेरिकेच्या दूतावासाच्या संपर्कात राहावे, असेही म्हटले गेले आहे.

अविनाश भोसले, छाब्रियांची 415 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त