खिशाला आराम…जवळपास सर्वच फळभाज्या स्वस्त

पुणे – दिवाळीनंतर आता भाजीपाल्याला मागणी कमी आहे. तर आवक जास्त प्रमाणात असल्यामुळे रविवारी बहुतांशी फळभाज्यांचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी घटले आहेत. बाजारात कांदा, लसूण, बटाटा वगळता बाकी सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव घटले आहेत. तर मटारचे भाव निम्म्याने घटले आहेत.

 

मार्केटयार्डात 80 ट्रक शेतमालाची आवक झाली. परराज्यांतून आलेल्या मालामध्ये मध्यप्रदेशातून 11 ट्रक मटार, कर्नाटक आणि गुजरातहून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरात येथून येथून कोबी 5 ट्रक, तमिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, राजस्थानहून 9 टेम्पो गाजर आणि मध्यप्रदेशातून लसणाची 2 ट्रक इतकी आवक झाली.

 

स्थानिक भागातून सातारी आले 700 ते 800 पोती, कोबी 4 ते 5 ट्रक, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, सिमला मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, पावटा 2 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, टॉमेटो 7 ते 8 हजार पेटी, गवार 8 टेम्पो, कांदा 100 ट्रक, जुना लसूण 15 ट्रक तर नवीन 2 गाड्या, आग्रा, इंदूर व स्थानिक भागांतून 30 ट्रक बटाटा इतकी आवक झाल्याची माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.

 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : 300-500, बटाटा : 350-380, लसूण : 500-1100, आले : सातारी 100-250, भेंडी : 150-200, गवार : 100-150, टोमॅटो : 100-150, दोडका : 150-200, हिरवी मिरची : 200-350, दुधी भोपळा : 20-50, चवळी : 100-150 काकडी : 60-80, कारली : हिरवी 150-200, पांढरी 100-110, पापडी : 200- 250, पडवळ : 150-200, फ्लॉवर : 30-60, कोबी : 140-160, वांगी : 200-250, डिंगरी : 100-150, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 150-200, तोंडली : कळी 150-200, जाड : 80-100, शेवगा : 600-800, गाजर : 200-300, वालवर : 200-250, बीट : 250-350, घेवडा : 300-400, कोहळा : 100-150, आर्वी: 100-120, घोसावळे : 100-150, ढेमसे : 150-160, पावटा : 300-400, भुईमूग शेंग : 400-500, मटार : 400-550, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, मका कणीस : 60-120, नारळ (शेकडा) : 1000-1600.

 

Leave a Comment