बोरगावच्या सर्वांगिण विकासासाठी कायम कटिबद्ध : आ. बाळासाहेब पाटील

कोरेगाव – कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या प्रत्येक गावाला विकासकामांच्या बाबतीत झुकते माप दिले आहे. बोरगाव येथे आजवर विविध विकासकामे झालेली आहेत. ग्रामदैवत श्री बाळसिध्दनाथ मंदिरासमोर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सभागृहामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.

बोरगाव येथे विविध विकासकामांना निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि विशेषत: ग्रामदैवत श्री बाळसिध्दनाथ मंदिरासमोर सभागृह उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन भागवत घाडगे यांच्यासह राजू निकम, अरुण घाडगे, विकास तांदळे, संजय घाडगे, विजय घाडगे, चंद्रकांत घाडगे, दीपक कदम व उमेश घाडगे यांनी आमदार पाटील यांची कराड येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन आभार मानले. यावेळी विविध विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा झाली. नजिकच्या काळात बोरगाव येथे विकासकामांच्या शुभारंभासाठी येणार असल्याचे आमदार पाटील यांनी ग्रामस्थांनी सांगितले.