अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

वॉशिंग्टन – साधारणपणे माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये अनेक जिवाणूंचा आणि विषाणूंचा सामना करावा लागतो त्यामुळे तो आजारी पडतो अशा प्रकारच्या विविध तीनशे सुपर बगवर एकच गुणकारी औषध आता अमेरिकेतील संशोधकांनी विकसित केले आहे विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूवर हे औषध आता उपयुक्त ठरणार आहे.

फेबीमायसिन असे या औषधाचे नाव असून या औषधांचे संशोधन सुरू असताना अनेक विषाणूंना प्रतिबंध करण्याची क्षमता या औषधात असण्याची गोष्ट समोर आली साधारणपणे औषधांना हे सुपरबग जुमानत नाहीत पण नव्या औषधाच्या माध्यमातून या सुपर बग वर मात करता येणार आहे.

संशोधकानी दिलेल्या माहितीप्रमाणे माणूस जर मोठ्या प्रमाणात औषधे किंवा अँटिबायोटिक्स घेत असेल तर त्यामुळे त्याच्या शरीरात असे बग किंवा विषाणू तयार होतात असे बगमुळे माणूस भविष्यकाळात पुन्हा एकदा आजारी पडू शकतो अशा प्रकारच्या बगवर हे नवे औषध परिणामकारक ठरणार आहे डेली मेल या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सुपर बगची बाधा झाल्यामुळे जगभरात दरवर्षी 70 लाखपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो पण या नवीन औषधमुळे सुपर बगवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

अमेरिकेतील संशोधकांनी सर्वात प्रथम या औषधाचा प्रयोग उंदरांवर केला युनिव्हर्सिटी ऑफ इलिनोईस च्या संशोधकांनी या औषधाचे 14 विविध प्रकार तयार केले जे मानवी उपयोगासाठी उपलब्ध होऊ शकतात त्वचा रोग रक्तदोष यासारख्या आजारांवर या औषधाच्या माध्यमातून मात करता येणे शक्य होणार आहे अमेरिकेच्या चा सेंटर फॉर हेल्थ अँड डिसीज कंट्रोल या संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे अमेरिका आणि इतर जगातील इतर सर्व देशांमध्येही अँटिबायोटिक आणि इतर काही औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे मानवी शरीरात सुपर बग तयार होतात नंतर विविध प्रकारच्या आजारांचा सामना माणसाला करावा लागतो.