रेखाच्या ‘या’ सवयीमुळे वैतागले होते अमिताभ बच्चन ! एके दिवशी संयमाचा बांध फुटला आणि म्हणाले…

 

मुंबई – अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहाणी जुन्या पिढीपासून ते आताच्या नव्या पिढीमध्ये देखील चर्चेचा विषय असते. एक वेळ अशी होती की दोघांनाही एकमेकांची कंपनी खूप आवडायची म्हणूनच कदाचित पडद्यावरची त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. परंतु अमिताभ बच्चन यांना रेखाची एक गोष्ट अजिबात आवडत नव्हती.रेखाच्या या सवयीमुळे बिग बी इतके नाराज झाले होते की त्यांनी तिला अनेकदा समजावले देखील होते.

रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी ‘दो अंजाने’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटातील दोघांची जोडी लोकांना खूप आवडली. हा चित्रपटही रंजक होता, पण या चित्रपटादरम्यान असे काही घडले, जे अमिताभ बच्चन यांना आवडत नव्हते. खरे तर अमिताभ बच्चन हे वक्तशीर आहेत. ते नेहमी ठरलेल्या वेळेत सेटवर येतात. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही जिथे बिग बी वेळेवर पोहोचायचे, परंतु तिथे रेखा अनेकदा शूटला उशिरा पोहोचायची. हे चक्र सतत चालू होतं. अमिताभ बच्चन यांना रेखाची ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती.

रेखाच्या उशिराने कंटाळून एके दिवशी अमिताभ बच्चन यांच्या संयमाचा बांध फुटला. याबाबत त्यांनी स्वत: रेखाशी संवाद साधला. अमिताभ बच्चन यांनी रेखाला स्पष्टपणे सांगितले की शूटिंगसाठी वेळेवर या आणि काम गांभीर्याने घ्या. आपल्या सहकाऱ्याने सांगितलेली ही गोष्ट ऐकून रेखाला सुरुवातीला आश्चर्य वाटले परंतु त्यानंतर त्यांनी कधीही सेटवर यायला उशीर केला नाही. योगायोग म्हणजे या दोन्हही कलाकारांचे जन्म दिवस एका पाठोपाठ आहेत. रेखा यांचा जन्म दिवस १० तर अमिताभ यांचा जन्म दिवस ११ ऑक्टोबर रोजी असतो.