मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचे अमोल कोल्हेंकडून कौतुक; म्हणाले…

मुंबई – राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेलं पत्र आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रतिउत्तर यांमुळे वादळी चर्चा रंगल्या. अनेकांनी राज्यपालांच्या पत्रातील भाषेबाबत आक्षेप व्यक्त करत हे ‘घटनेला’ धरून नसल्याचं म्हंटलं. तर दुसरीकडे राज्यपालांची भूमिका योग्यच असून उद्धव ठाकरे यांनी ‘राजकीय’ प्रतिउत्तर देण्याची गरज नव्हती अशाही प्रतिक्रिया उमटल्या.

हे सर्व सुरु असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहलेले पत्र रिट्विट केलं असून यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या पत्राचे भरभरून कौतुक करणारा संदेशही लिहला आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राची प्रशंसा करताना, “कमाल, लाजवाब, अप्रतिम! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या  सुसंस्कृत, प्रगल्भ, सडेतोड, रोखठोक उत्तराचा दीर्घकाळ स्मरणात राहिल असा नमुना! अनेक ऐकलेले वाक्प्रचार अनुभवायला मिळाले या पत्रातून!” असा संदेश दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर खात्याला टॅगही केलं आहे.

राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रयुद्ध

राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल एक पत्र लिहलं. या पत्रामध्ये त्यांनी तुम्ही हिंदुत्ववादाचे कट्टर समर्थक असतानाही मंदिरं कुलूपबंद का? असा प्रश्न उपस्थित केला. यासोबतच त्यांनी, ‘मंदिरं न उघडण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?’ असा प्रश्नही उपस्थित केला होता.

“राज्यपाल धर्मनिरपेक्ष आहेत की नाहीत? पंतप्रधानांनी तपासावे”

या पत्राला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी, ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांची हसत स्वागत माझ्या हिंदुत्वात बसत नाही.’ असा टोला लगावला. यासोबतच त्यांनी आपल्याला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचेही म्हंटले.

Leave a Comment