अमृता खानविलकर नव्या शोमधून येणार प्रेक्षकांच्या भेटीस?

Amruta Khanvilkar|  अभिनेता अमृता खानविलकर आणि अभिनेता संकर्षण यांचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अमृता आणि संकर्षण यांचे अपहरण झाल्याचे दिसत आहे. हा प्रोमो पहिल्यानंतर लवकरच दोघे एका नव्या शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण तिच्या या व्हायरल झालेल्या प्रोमोमुळे ती एखादी मालिका करणार की रिऍलिटी शो बाबत प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

नव्या प्रोजेक्ट बद्दल सोशल मीडिया वर रील पोस्ट करत अमृता म्हणते “नव्या रंगात नव्या ढंगात कमिंग सून” आता नेमका हा प्रोजेक्ट काय असणार याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. या दोघांची नवी मालिका आहे की नवा शो हे अद्याप स्पष्ट न झाल्याने यासाठी प्रेक्षकांना काही वेळ वाट पाहावी लागणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दरम्यान, अमृताने एका मागोमाग एक कमालीच्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3 , 36 डे या प्रोजेक्ट्स नंतर अमृता पुन्हा टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहे. या नव्या प्रोजेक्ट सोबत अमृता येणाऱ्या काळात  कलावती, ललिता बाबर , पठ्ठे बापूराव अश्या चित्रपटात दिसणार आहे.

गेल्या वर्षात अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा गाजला त्यानंतर ती हिंदी रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. तर संकर्षण कऱ्हाडेने ‘माझी तुझी रेशीमगा, ‘खुलता कळी खुलेना’या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘वेडिंगचा शिनेमा’ या सिनेमात तो महत्त्वाच्या भूमिकेत होता.