गजानन महाराज भक्तांसाठी पुन्हा सुरु होणार आनंद सागर

शेगाव – ‘श्री गजानन महाराज’ यांचा शेगाव येथे नेहमीच भक्तांची गर्दी दिसून येते. श्री गजानन महाराजांच्या गजराने नेहमीच शेगाव दुमदुमलेलं पाहायला मिळत. शेगाव येथे भक्तगण मंदिरा प्रमाणे आनंद सागर येथे जात असे. संत गजानन महाराज संस्थांकडून २००१ साली सरकार कडून जमीन घेऊन त्यावर धार्मिक,अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागर या पर्यटन आणि धार्मिक केंद्राची दोनशे एकरवर उभारणी करण्यात आली होती.

शेगावातील मंदिराप्रमाणेच आनंद सागर येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी दिसून येत असे, यामुळे येथे पर्यटन वाढलं होत. पण मध्यंतरी काही कारणामुळे शेगाव संस्थानाने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या दोन ते दीड महिन्यात आनंद सागर हे  भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणी बंद असलेल्या आनंद सागरला दुरुस्त करून रंग रांगोटी करण्याची तयारी संस्थानाने सुरू केली आहे. यामुळे संत गजानन महाराज भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे.