…अन् वाघोलीत मंत्र्यांनी कार्यकर्त्यांचा हट्ट पूर्ण केला

वाघोली (प्रतिनिधी) – वाघोली तालुका हवेली येथे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्याकडे त्यांचा कार्यकर्ता संपत गाडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि भोजनाचा आनंद कार्यकर्त्यांसमवेत घेण्याचा हट्ट केला होता. तो गृहनिर्माण मंत्री अतुल सावे पूर्ण केला आहे.

पुण्यातील मानाचे पाच गणपतींचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील विविध मंत्री प्रतिष्ठित, नागरिक तसेच देशपातळीवरच्या अनेक मान्यवरांच्या भेटी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाघोलीतील समाजसेवक संपत गाडे यांनी मंत्री अतुल सावे यांना वाघोलीत थांबून कार्यकर्त्यांशी संवाद साधून भोजनाचा आनंद घेण्याचा आग्रह केला होता.

मात्र धावपळीत मंत्र्यांचा ताफा जवळपास पेरणे फाटा ओलांडूनही गेला होता. मंत्र्यांनी गाडे यांच्याशी संपर्क साधून आपला ताफा पुन्हा माघारी वाघोलीत फिरवून कार्यकर्त्यांशी आपुलकीने चर्चा वार्तालाप करून जेवणाचा आनंद घेतला. मंत्र्यांच्या अनपेक्षित भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता.

यावेळी मंत्र्यांचा सत्कार वाघोली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी रघुनाथ गाडे, जीवन जाधवराव, आबासाहेब दातार, सुरज गाडे, सुमित गाडे, नवनाथ गाडे बापूसाहेब कटके आदी मान्यवर उपस्थित होते.