“एका लहरी माणसामुळे सगळ्यांना त्रास..” India-Bharat वादाबाबत अनुराग कश्यपने स्पष्टचं सांगितलं

मुंबई – दिग्दर्शक अनुराग कश्यप वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखला जातो. कमी बजेटमध्ये हटके आणि काहीतरी भन्नाट कलाकृती उभी करण्याचा अनुराग नेहमीच प्रयत्न करत असतो. मग कधी तो पुण्यातील हत्याकांडावर चित्रपट बनवतो तर कधी मुंबईतील बॉम्ब ब्लास्टवर.नुकतच अनुराग कश्यप यांनी इंडिया-भारत या वादावर भाष्य केलं आहे.

अनुराग आणि काँट्रॅव्हर्सी ही गोष्ट काही नवीन नाही. इंडिया ऐवजी भारत नाव वापरण्याबाब सध्या केंद्र सरकराने सुरुवात केली आहे. यावर बोलताना अनुराग कश्यप म्हणाले, “एका लहरी माणसामुळे सगळ्यांनाच त्रास सहन करावा लागतो आहे” एका मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत सविस्तर भाष्य केलं आहे.

“इंडिया-भारत मध्ये जर भारत हे नाव ठेवलं गेलं तर सगळ्या अधिकृत कागदपत्रांवर ते आणावं लागेल. सगळेच दस्तावेज नव्याने छापावे लागतील यासाठी खूप खर्च होईल त्यामुळे नाव बदलाच्या या निर्णयामुळे टॅक्स रूपातील निधीचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होईल” असं स्पष्ट मत यावेळी अनुरागने व्यक्त केलं आहे.

अनुराग पुढे म्हणाला,”एका लहरी माणसाच्या निर्णयाचे परिणाम सगळ्या देशाला भोगावे लागतील. मागचा-पुढचा विचार न करता निर्णय घेतला की आणखी काय होणार? या निर्णयामुळे बँकांमधल्या नोटा बदलाव्या लागतील, शिक्षणाच्या डिग्री बदलून घ्यावा लागतील,सगळ्यांनि घेतलेली करोना लस प्रमाणपत्रं बदलावी लागतील.. मला एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही काय काय पुन्हा छापणार? असा सवालच यावेळी अनुरागने यावेळी उपस्थित केला.