“ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे…” अभिनेता झीशान अय्युबने स्पष्ट केली भूमिका

मुंबई – कोरोनानंतरच्या काळानंतर OTT चा ट्रेंड अधिक सुरू झाला आहे. चित्रपटगृहांपेक्षा आता ओटीटीवर चित्रपट पाहणे ही लोकांची पसंती बनली आहे. OTT वर आलेल्या अनेक वेब सिरीजना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्या प्रचंड हिट झाल्या. यामुळेच आता प्रसिद्ध सुपरस्टार्सही ओटीटीवर काम करण्यास प्राधान्य देऊ लागले आहे. यातच आता अभिनेता झीशान अय्युबने OTT बाबत मोठे विधान केले आहे.

झीशान अय्युबने ओटीटीवरील कंटेंटबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. “ओटीटी प्लॅटफॉर्म्स आता अत्यंत फालतू गोष्टींनाही चांगले म्हणत आहे. ओटीटी फक्त चांगल्या कंटेंटबद्दल आहे असं आपण म्हणतो पण मला वाटतं की आता ओटीटी भ्रष्ट झाले आहे. ओटीटीवर कोणत्याही वाईट गोष्टींचे चांगले म्हणून वर्णन केले जात आहे. ओटीटीवरील अनेक अभिनेत्यांना त्यांनी चांगलं काम केलं नसूनही सन्मानित केलं जात आहे,” असं झीशान अय्युब म्हणाला आहे. त्याच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

झीशानने नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हड्डी’ चित्रपटात काम केले आहे. यात त्याने नवाजुद्दीनने साकारलेल्या पात्राच्या प्रियकराची भूमिका केली आहे. या भूमिकेबाबत तो म्हणतो की, ” माझी भूमिका मोठी आहे की लहान याने मला काही फरक पडत नाही. मला फक्त आनंद घेत माझे काम करत राहायचे आहे. हड्डीमध्ये अनुराग कश्यपबरोबर माझे फारसे सीन नाहीत, पण असे  असूनही मला या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारताना खूप छान वाटले.”

दरम्यान, झीशानने ‘स्कूप’ सीरिजमध्ये इमरान नावाच्या संपादकाची भूमिका साकारली होती, जी प्रचंड लोकप्रिय झाली होती. याशिवाय त्याने नो वन किल्ड जेसिका, तांडव, तनु वेड्स मनू, आर्टिकल 15, झिरो या चित्रपटांमध्येही काम केले आहे.