पैशांसाठी काहीही… महिलेने जिवंत असलेल्या नवऱ्याचं मारून टाकलं अन्…

ओडिशा रेल्वे अपघाताची भरपाई मिळावी म्हणून एका महिलेने आपल्या जिवंत पतीला मृत घोषित केले. बनावट कागदपत्रेही दिली. पण महिलेचे हे खोटे पकडले गेले. हे प्रकरण कटक जिल्ह्यातील मणिबंध परिसरातीलआहे. येथे राहणाऱ्या गीतांजली दत्ता पहिले रुग्णालयात पोहोचली जेथे रेल्वे अपघातात प्राण गमावलेल्या प्रवाशांचे मृतदेह ओळखण्यासाठी ठेवण्यात आले होते.  Odisha Train Accident 

वृत्तवाहिनीच्या यांच्या रिपोर्टनुसार, गीतांजलीने बालासोर येथील एका प्रवाशाचे बनावट आधार कार्ड दाखवले होते. तिच्या पतीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र, पडताळणीत पतीला मृत घोषित करून भरपाई मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी उघड केला.  पीटीआयच्या रिपोर्टनुसार, गीतांजलीचे खोटे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिला इशारा देऊन सोडले. मात्र याच दरम्यान गीतांजलीचा पती विजय याने तिच्याविरोधात मणिबंध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितले की, ‘पती-पत्नी गेल्या 13 वर्षांपासून वेगळे राहत आहेत. विजयने आपली पत्नी गीतांजली यांच्यावर सर्वसामान्यांचा  पैसा घेण्यासाठी त्याच्या खोट्या मृत्यूची कट रचल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. मणिबंध पोलिस स्टेशनचे प्रभारी बसंत कुमार सत्पथी यांनी सांगितले की, पोलिसांनी गीतांजलीच्या पतीला बहंगा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. ओडिशाचे मुख्य सचिव पीके जेना यांनी रेल्वे आणि ओडिशा पोलिसांना मृतदेहांवर खोटा दावा करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे.

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बालासोर ट्रेन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. त्याचवेळी, रेल्वे मंत्रालयाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

2 जून रोजी सायंकाळी 7 वाजता कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले. दरम्यान, दुसऱ्या ट्रॅकवरून जाणारी यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेस कोरोमंडल डब्यांना धडकली. या अपघातात एकूण 288 जणांचा मृत्यू झाला आहे.