nagar | नाशिक मतदार संघातून आप्पासाहेब शिंदेंचा अर्ज दाखल

नगर, (प्रतिनिधी) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब रामराव शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक येथील आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.६) रोजी शिंदे यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे अर्ज सुपुर्द केला. यावेळी नगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामधून शिक्षक, कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पाचही जिल्ह्यांमधील संस्थाचालक तसेच राजकीय पुढारी यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. हा मतदारसंघ घटनेप्रमाणे फक्त शिक्षकांसाठी दिला गेलेला आहे. आणि या मतदारसंघांमध्ये पाचही जिल्ह्यात कार्यरत शिक्षक म्हणून काम करणारे अप्पासाहेब शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

यावेळी सर्व कार्यरत शिक्षकांनी शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी टीडीएफचे जिल्हाध्यक्ष एम.एस. लगड, सचिव मुस्ताक सय्यद, चांगदेव कडू, राज गवांदे, विठ्ठलराव पानसरे, संभाजी गाडे, प्राचार्य वाव्हळ, बाळासाहेब निवडुंगे, आत्माराम दहिफळे, समाधान आरक, अमोल ठाणगे, नंदकुमार शितोळे, बाळासाहेब मुळे, आदी शिक्षक कार्यलर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.