सातारा | माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा, (प्रतिनिधी) – माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्डाच्या माजी सैनिक वेलफेअर फंडातून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. सर्व माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांनी केले आहे.

मदतीचा प्रकार – चरितार्थासाठी आर्थिक मदत – अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025, चरितार्थासाठी आर्थिक मदत (नूतनीकरण), 1 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025, शैक्षणिक मदत – पहिली ते पदवीपर्यंत, 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर 2024, मुलीच्या लग्नाकरिता मदत, लग्नानंतर 180 दिवसांच्या आत, 100 टक्के गतिमंद/दिव्यांग पाल्य मदत, मुदत नाही, 100 टक्के गतिमंद/दिव्यांग पाल्य मदत (नूतनीकरण), 1 डिसेंबर 2024 ते 31 मार्च 2025. या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवांच्या पाल्यांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.