लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गजानन पवार यांची नियुक्ती

वाघोली (प्रतिनिधी) : लोणीकंद पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांची वाहतूक विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागेवर विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार नियुक्ती झाली आहे. पवार यांनी पदभार स्विकारला असून वाघोली व परिसरातील ग्रामस्थांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.

गजानन पवार यांनी आतापर्यंत मुंबई, नागपूर, गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) आणि पुणे शहरातील गुन्हे शाखेत उत्कृष्टपणे कर्तव्य बजावले आहे. ते १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. 

पोलीस दलात कार्यरत असताना त्यांना आतापर्यंत साडे चारशेहून अधिक बक्षीसे मिळाली आहेत. त्यांना २०११ मध्ये पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आणि २०१९ मध्ये राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी त्यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचा नियुक्तीबद्दल  माजी जिल्हा परिषद  रामभाऊ दाभाडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील,  सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, उपसरपंच महेंद्र भाडळे, सामाजिक कार्यकर्ते संदेश आव्हाळे  आदींनी नियुक्तीबद्दल सत्कार केला आहे.