nagar | टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत मिळणार मंजुरी

नगर, (प्रतिनिधी) – पाणीटंचाई परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल होताच ७२ तासांत तो मंजूर करण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना दिले. असल्याचे जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्हाभरातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांत व्यस्त आहेत. अशा परिस्थितीतही टंचाई उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन सतर्क आहे.

टंचाई कालावधीत प्रत्येक टंचाईग्रस्त गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. याबाबत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. सध्या टंचाईग्रस्त गावांतील साडेपाच लाख जनतेला २९६ टॅकर्सव्दारे पाणीपुरवठा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच निवडणूक काळात टंचाई ग्रस्त गावाचे आलेले प्रस्ताव ७२ तासात त्या प्रस्तावास मंजूरी द्यावी, असे ही त्यांनी म्हटले आहे.