आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीच्या स्वप्नांना मिळणाली नवी भरारी; अरुंधतीचं मच अवेटेड गाणं रिलीज

मुंबई :  : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते  ही मालिका प्रेक्षकांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. लवकरच मालिकेत अरुंधतीच्या आयुष्यात येणारं एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आजवर अरुंधतीने आपली स्वप्न, आवडीनिवडी बाजूला सारुन कुटुंबाला सर्वस्व मानलं. मात्र आता अरुंधतीच्या स्वप्नांना नवी भरारी मिळणार आहे. गाण्याची आवड असणारी अरुंधती आता मालिकेत पार्श्वगायिका झाली आहे. आशुतोषच्या मदतीने ती तिच्या आयुष्यातलं पहिलं गाणं रेकॉर्ड  केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे… अंतरावर परसलेले टिपूरसे… सुखाचे चांदणे’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील शब्द आणि अरुंधतीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. हे गाणं ऐकल्यानंतर अनिरुद्ध देशमुखला  अश्रू अनावर झाले… अन् अनिरूद्ध रडला असल्याचं बोललं जातंय.

अरुंधतीचं मच वेटेड गाणं आता रिलिज झालं आहे. अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे… अंतरावर परसलेले टिपूरसे… सुखाचे चांदणे’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील शब्द आणि अरुंधतीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या गाण्याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळतोय. संगीतकार निलेश मोहरीर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गायिका विद्या करलगिकर यांनी गायलं आहे.