…यामुळे हिमाचल प्रदेशातील तब्बल 685 मार्ग बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्ठीमुळे संपुर्ण देशात गारठा पसरला आहे. याच बर्फवृष्ठीमुळे हिमाचल प्रदेशातील तीन राष्ट्रीय महामार्गांसहीत तब्बल 685 मार्ग बंद करण्यात आले होते. त्यात शिमला, लाहुल स्पिती, चंबा, किन्नौर, सिरमौर, सोलन या परिसरातील काही भागांचा समावेश आहे.

तब्बल 685 मार्ग बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्रशासनाकडून याबाबत संपुर्ण खबरदारी घेतली जात आहे. मात्र नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शिमला, लाहुल स्पिती, चंबा, किन्नौर, सिरमौर, सोलन वीजपुरवठाही खंडीत झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

तापमानाचा पारा शुन्यापेक्षा खाली घरसल्याने पाईपलाईन्स गोठल्या आहेत. त्यामुळे शिमल्यातील अनेक परिसरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिमाचल प्रदेशातील काही भागात तापमान शुन्य अंशापेक्षा कमी आहे. तर मनाली-शिमलामध्ये तापमान शून्य अंश आहे.