संजय सिंग प्रकरणाला काँग्रेसने पाठिंबा न दिल्याने केजरीवाल म्हणाले,’आम्हाला काही फरक पडत नाही..’

Sanjay Singh Arrest Case : आम आदमी पक्षाचे  सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( arvind kejriwal news ) यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय सिंह यांच्या अटकेवर तिखट प्रतिक्रिया दिली. आपल्यावर केलेले सर्व आरोप खोटे असून त्यांची चौकशी करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकार नुसते आरोप करते आणि तपास करते, पण काहीही सापडत नाही, असे केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

जेव्हा अरविंद केजरीवाल यांना मीडियाने विचारले की, काँग्रेस पक्ष संजय सिंग प्रकरणाला उघडपणे पाठिंबा देत नाही, तेव्हा केजरीवाल  म्हणाले की, काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही तर काही फरक पडत नाही. त्यांच्या पाठिंबा मिळाला नाही मिळाला तरी  काय फरक पडतो?” असा उलट प्रश्नच केजरीवाल यांनी पत्रकारांना विचारला आहे,

गुरुवारी पूर्वेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( arvind kejriwal news ) दिल्ली परिसरातील गाझीपूर लँडफिल साइटवर कचऱ्याचे डोंगर हटवण्याचे सुरू असलेले काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “…शालेय वर्गखोल्या, वीज, रस्ते, पाणी बांधकामात घोटाळा झाल्याचे  भाजप सरकारने सांगितले. सर्व तपासण्या केल्या पण काही सापडले नाही. आता हा संपूर्ण दारू घोटाळा खोटा असल्याचे समोर येत आहे…  भाजपकडे एकही एकही पुरावा नाही.’