महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या राज्यउपाध्यक्षपदी पै. प्रमोद हरगुडे यांची निवड

वाघोली – केसनंद ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पै.प्रमोद चंद्रकांत हरगुडे यांची महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना निवडीचे पत्र शिवसेना नेते तथा माजी मंत्री सचिन अहिर यांच्या हस्ते  केसनंद तालुका हवेली येथे देण्यात आले.

महाराष्ट्रातील कुस्ती वाढवणे, कुस्तीचा प्रचार व प्रसार करणे तसेच कुस्तीची मैदाने व कुस्ती स्पर्धा घेणे यासाठी राज्यभर महाराष्ट्र  कुस्तीगीर संघ कार्यरत असून प्रमोद हरगुडे यांच्या निवडीने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हरगुडे यांनी सर्वसामान्य तसेच गोरगरीब पैलवानांना व मोठे साहाय्य करून राज्यस्तरावर पोचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. पै. प्रमोद हरगुडे यांचा निवडीबद्दल केसनंद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस प्रदीप भोसले, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर कटके,माजी आमदार बापूसाहेब पठारे, पै. नितीन दांगट पाटील, माजी सरपंच मिलिंद हरगुडे,सरपंच नितीन गावडे,माजी सरपंच तानाजी हरगुडे, माजी पोलीस उपविभागीय अधिकारी सुदामराव पाटील, माजी सरपंच विश्वनाथ हरगुडे, उद्योगपती नानासाहेब आबनावे, प्रकाश जाधव, सचिन जाधव, तानाजी बांगर,तुकाराम वाबळे,तुकाराम जाधव, गणेश हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हरगुडे, विशाल हरगुडे, दत्तात्रय हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, सचिन हरगुडे, दिनेश झांबरे, धनंजय हरगुडे,

तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत, उमेश मोरे, सुभाष बांगर, अनिल जाधव, गणेश येवले, लखन ढोरे, शिवाजी शिंदे, अमित येवले, अमोल हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.