अस्थमा असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूूचा धोका कमी

नवी दिल्ली- कोविड -19 मुळे अस्थमाचा आजार असलेल्या लोकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण कमी असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. अस्थमा असून कोरोना झालेल्या रुग्णांना आता हॉस्पिस्टल मध्ये दाखल होणे किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने श्वासोच्छवास घेण्याीच काहीच गरज भासणार नाही. मात्र ज्यांना अस्थमा नाही पण कोरोनाची लागण झाली आहे अशा लोकांना त्याची गरज भासत आहे.

त्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णांना कोरोना व्हायरस जरी झाला तरी त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असल्याचे एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे.बोस्टन हेल्थकेअर सिस्टमच्या संशोधकांनी 562 अस्थमा रुग्ण आणि 2,686 अस्थमा नसलेले कोविड-19 रुग्ण यांचा अभ्यास केला. दोन्ही गटांना समान दराने (18% ते 21%) रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे यांत्रिक वेंटिलेशनची आवश्यकता होती.  अस्थमाच्या रुग्णांचा व्हायरसमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 70% कमी होते .गंभीरअस्थामाचा आजार असलेल्या 44 रुग्णांपैकी कोणाचाही मृत्यु झाला नाही, असं संशोधकांनी सांगितले आहे.

Leave a Comment