बहिणीने भिकारी म्हटले म्हणून भावाच्या खूनाचा प्रयत्न

पुणे – मित्रांबरोबर बाहेर जात असताना बहिणीने भिकाऱ्यासारखा का त्यांच्याबरोबर फिरतोस असे म्हटले. याचा राग मनात ठेऊन एका तरुणाच्या खूनाचा प्रयत्न करण्यात आला. संबंधीत तरुणावर सिमेंटचा ब्लॉक आणी चिनी मातीच्या भांड्याने डोक्‍यावर हल्ला करण्यात आलो याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश चंद्रकांत महापुरे (19, रा. गायकवाडवस्ती, मुुंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंजली दत्तात्रय गायकवाड (66, रा. गायकवाड वस्ती, मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात दिनेश गायकवाड हा जखमी झाला. हा प्रकार रविवारी बिडकर वस्ती येथे घडला.

यातील फिर्यादी यांचा मुलगा दिनेश हा पेंटीग काम करतो. तर आरोपी आकाश महापुरे हा त्याच्या शेजारीच राहणारा आहे. रविवारी सायंकाळी दिनेश हा घरात जेवत असताना आकाश हा त्याच्या घरासमोर आला. जेवत असताना आकाश त्याला बरोबर घेऊन गेला. दरम्यान, दिनेशच्या बहिणीला आकाश हा दिनेशला जेवत्या ताटावरून घेऊन गेल्याचे समजले.

त्यावेळी दिनेशच्या बहिणीने त्याला बोलवून त्याला तु भिकाऱ्यासारखा का फिरतोस म्हणत, आईला दम्याचा त्रास आहे, तीची काळजी घे असे म्हटले. हे ऐकताच दिनेश बरोबर आकाश आणि त्याचा दुसरा मित्र छोटु पिल्ले असे घराजवळ आले. छोटूने दिनेशच्या बहिणी बरोबर वाद घालत तु आम्हाला भिकारी का म्हणालीस याची विचारणा केली.

यानंतर आकाश हा दिनेशला पुन्हा बाहेर घेऊन गेला. पुन्हा आकाश दिनेशच्या घरी आला आणि त्याने दिनेशच्या आईला शिवीगाळ केली. तो जात असताना फिर्यादी आईला आकाशच्या बरमुड्यावर रक्ताचे डाग दिसले. तसेच तो लंगडत चालत असल्याचे दिसले. यामुळे तीला काहीतरी अघटी घडल्याचा संशय आला.

Leave a Comment