“मला तुझा शर्ट मिळेल का”, चिमुकल्या चाहत्याच्या मागणीला वॉर्नरचा खास संदेश

AUS vs ENG  – ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. त्यांनी टी-२० विश्वविजेत्यांना ६ गडी राखून मत दिली होती. दोन्ही संघांमधील हा सामना ऍडिलेडच्या मैदानावर खेळला गेला. दरम्यान, लाइव्ह सामन्यावेळी कॅमेरा स्टँडकडे वळला तेव्हा एक मानला स्पर्श करणारे चित्र दिसले. एका चिमुकल्या चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला अनोखी मागणी केली. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

“विराट कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा खेळाडू”,स्टीव्ह स्मिथचं भाष्य!

सामन्यादरम्यान ( AUS vs ENG ) ऑस्ट्रेलिया संघाच्या डावाच्या ४६ व्या षटकात कॅमेरामनने कॅमेरा गॅलरीच्या दिशेने वळवला. यावेळी एका चिमुकल्या चाहत्याने पोस्टरवर लिहिलेली खास मागणी स्पष्ट दिसत होती. डेव्हिड वॉर्नर मला तुझा शर्ट मिळू शकतो का? असे त्या चिमुकल्याने लिहिले होते. हे पाहिल्यावर वॉर्नरसह त्याचा सहकारी खेळाडू मार्नस लबुशेनही हसायला लागला.

यानंतर व्हिडिओत लबुशेन वॉर्नरचा शर्ट काढण्याचा प्रयत्न करतो. त्यावर वॉर्नर म्हणतो की, मी आतमध्ये काहीच नाही घातलेले. यावरून ड्रेसिंग रूममधील खेळाडूंमध्ये जोरदार हशा पिकतो. यानंतर वॉर्नरने देखील एक पोस्टर कॅमेऱ्याकडे दाखवले ज्यावर लिहिले होते की, मार्नस लाबुशेनकडूनही शर्ट घ्या. त्यावर चिमुकला चाहता पोस्टरद्वारे मार्नस लाबुशेनकडूलाही शर्टाची मागणी घालतो. यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये हशा सुरु होतो.

सामन्यात ( AUS vs ENG ) प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत २८७/९ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ चेंडू बाकी असताना २९१/४ धावा करत सामना जिंकला. मात्र, इंग्लंडच्या डेव्हिड मलानला सामन्यातील त्याच्या शानदार शतकी खेळीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियन संघाकडून २८८ धावांच्या लक्ष्याचा करताना डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी १४७ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ८४ चेंडूंत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८६ धावा करून बाद झाला. त्याचवेळी हेडला ५७ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. यानंतर स्टीव्ह स्मिथने कॅमेरून ग्रीनच्या साथीने ऑस्ट्रेलियन संघाला विजय मिळवून दिला.