तुरुंगातील मुक्काम वाढणार कि सुटका होणार ? केजरीवाल यांचा आज होणार फैसला..

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय आज  (मंगळवार) दिल्ली उच्च न्यायालय जाहीर करणार आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. ती कारवाई ईडीने २१ मार्च यादिवशी केली. त्या अटकेला केजरीवाल यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले. अटकेची कारवाई … Read more

नितेश राणे यांच्यावर कारवाई होणार का ? ‘त्या’ प्रकरणी उच्‍च न्‍यायालयाचा आयुक्‍तांना सवाल

Nitesh Rane high Court : फेब्रुवारी महिन्यात धार्मिक मुद्यावर भडकावू भाषण दिल्याप्रकरणी दाखल याचिकेची मुंबई हायकोर्टाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे आणि गीता जैन यांच्यावर कारवाई करणार का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. या संदर्भात मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना आठवडाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील … Read more

“छत्तीसगडमधील अदिवासींच्या हक्काचे रक्षण करण्यात मोदींना अपयश”

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील आदिवासी समुदायांच्या हक्कांचे रक्षण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयश ठरले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मोदी आदिवासी कल्याणासाठी कधी तरी खऱ्या अर्थाने स्वत: ला समर्पित करतील का असा सवालही कॉंग्रेसने उपस्थित केला आहे. पंतप्रधानांची आज छत्तीसगड मधील बस्तर येथे सभा होणार आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदींना … Read more

भाजपा इतक्या जागांच्या जवळ पोहोचेल ! प्रशांत किशोर यांनी थेट आकडाच सांगितला

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने कितीही ३७० जागा पक्षाला मिळतील, अशी रणनीती तयार केली असली, तरिही ते ३०० जागांच्या जवळ पोहोचतील आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसह त्यांना ३२५ ते ३३० जागांवर समाधान मानावे लागेल, असे मत ज्येष्ठ राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. पीटीआय संपादकांच्या परिषदेत किशोर बोलत होते. मोदींच्या नेतेपदात भाजपची तिसरी … Read more

“..म्हणून भाजपकडून पुन्हा हिंदु-मुस्लिम अपप्रचार” काँग्रेसचा थेट आरोप

नवी दिल्ली – यंदाच्या लोकसभानिवडणुकीत भाजप १८० जागांचा आकडा गाठणे कठीण असल्याची जाणिव झाल्याने त्यांनी आता पुन्हा हिंदु-मुस्लिम अपप्रचाराचा आधार घ्यायला सुरूवात केली आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिमी लीगची छाप असल्याचा जो आरोप केला होता त्याचा आज कॉंग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी जोरदार प्रतिवाद केला. त्यावेळी त्यांनी हा आरोप … Read more

“400 पार विसरा, शंभरी तरी गाठता येईल का ते पहा..”

नवी दिल्ली – रोजगार, शेतकरी, युवक आणि मजूर यासारख्या घटकांच्या समस्येवर पंतप्रधान काहीच बोलत नसतील तर भाजपने चारशेचा टप्पा पार करून उपयोग काय असा सवाल राजदेचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी देशातील खऱ्या समस्यावर ते बोलत नसतील तर ४०० जागा विसरून जा; लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए युतीला १०० जागाही … Read more

के कवितांना अंतरिम जामीन नाकारला..

नवी दिल्ली – दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने सोमवारी भारत राष्ट्र समिती म्हणजेच बीआरएस पक्षाच्या नेत्या आमदार के. कविता यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. आपल्या अल्पवयीन मुलाची शालेय परीक्षा असल्याच्या कारणावरून त्यांनी अंतरिम जामीन मागितला होता. दिल्ली सरकारच्या मद्य घोटाळा प्रकरणात त्या ईडीच्या कोठडीत आहेत. बीआरएस नेत्याच्या जामीन अर्जाला ईडीच्या वकिलाने विरोध केला. त्यांनी युक्तिवाद केला … Read more

केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल मध्ये धमकावण्याचे प्रकार ! तृणमुल ठोठावणार निवडणूक आयोगाचे दार

नवी दिल्ली – भाजप कडून पश्‍चिम बंगाल मध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांना धमकावण्याचे काम केले जात आहे त्याबद्दल तक्रार करण्यासाठी तृणमूल काँग्रेसचे १० सदस्यीय शिष्टमंडळ नवी दिल्लीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व टीएमसीचे राज्यसभेतील नेते डेरेक ओब्रायन करणार असून खासदार डोला सेन हे निवडणूक आयोगाच्या पूर्ण खंडपीठाला भेटणार आहेत. भाजप आमच्या … Read more

कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे फारूख अब्दुल्लांनीही केले समर्थन,म्हणाले..

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याचे कौतुक केले आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा देश मजबूत करणारा आणि देशाचे धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप कायम ठेवणारा आहे असे त्यांनी म्हटले आहे. या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी केलेली टीकाही त्यांनी फेटाळून लावली आहे. जाहीरनाम्याचे प्रत्येक पान देशाला तोडणारे आहे असे पंतप्रधानांनी … Read more

दक्षिण कोरियाने प्रक्षेपित केला दुसरा हेरगिरी उपग्रह..

नवी दिल्ली – दक्षिण कोरियाने आपला दुसरा हेरगिरी विषयक उपग्रह प्रक्षेपित केला आहे. उत्तर कोरियाने या वर्षभरात अनेक टेहळणी विषयक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर केल्यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. दोन्ही कोरियांनी गेल्याच वर्षी आपले पहिले हेरगिरी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. उत्तर कोरियाने नोव्हेंबर महिन्यात तर दक्षिण कोरियाने डिसेंबर महिन्यात आपापल्या … Read more