पुणे | मध्य प्रदेशातील तरुणाकडून ७ दुचाकी जप्त

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – खडक पोलिसांनी संशयावरून अटक केलेल्या मध्य प्रदेशातील व्यक्तीकडून चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला होता. गोवर्धनप्रसाद ललवा साहू (३५, रा. स. नं. १२०, किष्किंधानगर, कोथरूड, मूळ जिल्हा- उमरीया, मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तो पुण्यात मिक्सर दुरुस्तीचे काम करतो. त्याच्यावर २०१८ मध्ये … Read more

पुणे | शैक्षणिक संस्थेच्या इमारतीला आग

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या खासगी शैक्षणिक संस्थेत मध्यरात्री आग लागली. संस्थेच्या आवारातील कार्यालयात झाेपलेल्या वसतिगृह कर्मचाऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. वसतिगृहातील ४० विद्यार्थिनींंची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली. सदाशिव पेठेतील बॅ. गाडगीळ रस्त्यावर निलया इन्स्टिट्यूट आहे. या संस्थेकडून वाणिज्य विषयक अभ्यासक्रम चालविले जातात. संस्थेची … Read more

पुणे | पहिला ‘हरित ऊर्जा’ प्रकल्प कार्यान्वित

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महावितरणच्या राज्यभरातील विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्सला सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या नियोजनातील पहिला प्रकल्प गणेशखिंड येथे नुकताच कार्यान्वित झाला आहे. महावितरणच्या प्रकाश भवनाच्या छतावर ६० किलोवॅटच्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे त्याच ठिकाणी असलेल्या विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दरमहा सुमारे ७ हजार २०० युनिट … Read more

पुणे | बारावी उत्तीर्णांसाठी कमवा आणि शिका योजना

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसठी जिल्‍हा परिषदेच्‍या समाज कल्‍याण विभागातर्फे कमवा आणि शिका ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी इच्‍छुक विद्यार्थ्यांनी दि. १५ जूनपर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्‍ह परिषदेने केले आहे. या योजनेंतर्गत झेडपीच्‍या समाजकल्याण विभागात … Read more

पुणे | कलाकारांमध्ये स्वाभिमान जरुरी; पण अहंकार नसावा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – एकल सादरीकरण आणि साथसंगत करत असताना प्रत्येक वादकाची समरस भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कलाकार आपल्या कलेवर प्रेम करतच असतो. मात्र, ज्याच्यासोबत आपण वादन करीत आहोत, त्या गायकासोबत प्रामाणिकपणे एकरूप होऊन सादरीकरण करणारे वादक फार कमी असतात. कलाकारामध्ये अहम नसावा. मात्र, स्वाभिमान आणि विनम्रता असणे गरजेचे आहे, असे मत मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध … Read more

पुणे | आरटीई ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेसाठी शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली. या सोडतीद्वारे शाळा मिळालेल्या पालकांना दि. १२ जूननंतर प्रवेशाचे एसएमएस पाठविण्यात येणार आहेत. कुमठेकर रस्‍त्‍यावरील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सकाळी ११.३० वाजता इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांच्या हस्ते … Read more

पुणे | वन्यजीव गुन्ह्यात आता श्वानपथकाची मदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वन्यजीव गुन्ह्यात आता श्वानपथकाची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी श्वानांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले आहे. आणखी काही श्वानांना प्रशिक्षित करण्यात येत आहे. महाराष्ट्रात वन्यजीव गुन्हे शोधण्यासाठी स्वतंत्र श्वानपथक असलेले पुणे वनविभाग एकमेव वनविभाग आहे, असे RESQचे सदस्य आणि भारतात कार्यरत असलेले किरण रहाळकर यांनी सांगितले. मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना लक्षात घेऊन … Read more

पुणे | लष्कराच्या हद्दीतून आले पावसाचे पाणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – धानोरी आणि कळस परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने लक्ष्मीपार्क परिसरात डोंगराच्या बाजूला असलेल्या लष्कराच्या शुटींग रेंज मधून मोठया प्रमाणात पावसाचे पाणी तसेच राडारोडा वाहून आला. परिणामी, या भागातील अनेक घरांत तसेच दुकानात पावसाचे पाणी शिरले. दुकाने आणि वाहनांचेही नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी केली. लष्कराच्या हद्दीतून … Read more

पुणे जिल्हा | …तरीही पोलीस फिरकलेच नाहीत

उरुळी कांचन, (वार्ताहर) – हवेली तालुक्यातील उरुळी कांचन जवळील शिंदवणे टिळेकरवाडी, खामगाव टेक परिसरात मागील दोन दिवसांपासून फिरणार्‍या ड्रोनमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील आठ दिवसांपासून रात्री साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास दोन ड्रोन दिसून येत होते. यावेळी शिंदवणे व टिळेकरवाडी येथील काही नागरिकांनी व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. तसेच उरुळी कांचन पोलिसांना 112 या नंबरवर … Read more

पुणे जिल्हा | पवारांचे लक्ष्य छत्रपती कारखाना?

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चावी वर्षानुवर्षे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदा गुरुवारी (दि. 6) रात्री इंदापुरात पोहोचल्या आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना पूर्ण ताकतीने लढवायचा आहे आणि जिंकायचा आहे, अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली … Read more