भरधाव कारने दोघांना उडवले ; फुरसुंगी रस्यावरील घटना

भरधाव कारने दोघांना उडवले ; फुरसुंगी रस्यावरील घटना पुणे,दि.14- भरधाव कारने एका रिक्षा चालकासह दोघांना उडवल्याची घटना फुरसुंगी येथील आयबीएम कंपनीसमोर घडली. रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेत रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी कार चालकाला मारहाण करुन कारच्या काचा फोडल्या. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रविंद्र दादासाहेब खेसे (48,रा.भोसले गार्डन, हडपसर)याला ताब्यात घेतले आहे. नंदकुमार कुंडलीक … Read more

गुन्हेगारीचे शतक केलेला सराईताला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

पुणे- चोरीच्या गुन्ह्यांत सराईत असलेल्या गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. हा चोरटा 1984 पासून गुन्हेगारीत असून आत्तापर्यंत त्याने 100 हून अधिक ठिकाणी हात साफसफाई केली आहे. राजू बाबूराव जावळकर (वय 55, रा खानापूर, सिंहगड रोड) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून ट्रक, टेम्पो व दुचाकी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणण्यात चंदननगर पोलिसांना यश आले … Read more

मनसे कसबा उपविभाग अध्यक्षावर गुन्हा

मनसेचे कसबा विधानसभा उपविभाग अध्यक्ष संग्राम तळेकर (45, रा. खडकमाळ अळी) यांच्यासह चौघांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभाग येथे आंदोलन करताना कार्यालयाची तोडफोड, अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि शासकीय वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. हे आंदोलन मंगळवारी करण्यात आले होते. याप्रकरणी आतिष जाधव (50,रा.चिंतामणीनगर) यांनी फिर्याद दिली … Read more

गोट्याला भेटल्याने छोट्याने तोडली तीन बोटे

पुणे(प्रतिनिधी) – पुर्व वैमनस्य असलेल्या गोट्या नावाच्या व्यक्तीला भेटल्याने छोट्या उर्फ अभिषेक अलटेने एकावर धारदार शस्त्राने वार केले. गणेश ठाकुर (25,रा.बिबवेवाडी) असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीने नाव आहे. या हल्लयात त्याच्या हाताची तीन बोटे तुटून पडली आहेत. ही घटना वानवडी येथील नेपीयर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  फिर्यादी गणेश … Read more

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून : उत्तमनगर येथील घटना

पुणे- चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा डोक्‍यात जड वस्तूने वार करत खून करण्यात आला. खून केल्यानंतर पती घटनास्थळावरुन पळून गेला आहे. उत्तमनगर पोलिसांचे पथक पतीच्या शोधासाठी रवाना झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी हवेली तालूक्‍याती खडकवाडतील ढमढेरे पोल्ट्री फार्ममध्ये घडली. पुजा तुषार ढमढेरे(30) असे मृत महिलेचे नाव आहे. तर तुषार उर्फ बबलु राजाराम ढमढेरे(35) याच्यावर गुन्हा दाखल … Read more

घर खाली करण्यास सांगितल्याने घर मालकाला मारहाण

पुणे – घरखाली करण्यास सांगितले म्हणून भाडेकरुने घरमालकास लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ही घटना पद्मावती येथील मातंग हौसिंग सोसायटीमध्ये घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात राजेश मोतीलाल रजपूत, राकेश मोतीलाल रजपूत, विक्रांत राजेश रजपूत यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी सोनू सुनील अवघडे (22, रा.पांडवनगर, शिवाजीनगर) यांचे वडिल पीएमपीमध्ये नोकरीस होते. त्यांचा 2019 मध्ये मृत्यू झाल्याने त्यांना राहाते … Read more

गाळा स्वत:च्या नावाने नसताना भाड्याने देऊन फसवणूक

गाळा स्वत:च्या नावाने नसताना भाड्याने देऊन फसवणूक पुणे, दि. 8 – गाळा स्वत:च्या नावाने नसताना डिपॉझिट व पिग्मीसाठी 5 लाखांची रक्‍कम घेऊन एकाची फसवणूक केली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात सिताराम गोविंद भिकुले (रा. वेल्हे) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. फिर्यादी बाबु यल्लाप्पा सदावर (21, रा. चंदगड, कोल्हापूर) याने पर्वती येथील एक गाळा आरोपीच्या मदतीने पाहिला … Read more

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारी तरुणांची टोळी जेरबंद

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारी तरुणांची टोळी जेरबंद पुणे,दि.24 मौजमजा करण्यासाठी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून दुचाकी चोरुन त्याची ग्रामीण परिसरात विक्री करणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात पुणे पोलीसांच्या हडपसर पोलीस ठाण्यातील पथकास यश आले आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून वेगवेगळया कंपनीच्या 12 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या एकूण 25 मोटार सायकल जप्त करण्यात … Read more

ऍट्रोसिटीची भिती दाखवत डॉक्‍टरकडून उकळली 75 लाखाची खंडणी

पुणे: शहरातील नामांकित डॉक्‍टरला ऍट्रोसिटीच्या गुन्हयाची भिती दाखवत तब्बल 75 लाखाची खंडणी उकळण्यात आली. उर्वरीत 55 लाखाच्या खंडणीसाठी वारंवार त्रास दिल्याने संबंधीत डॉक्‍टरने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानूसार मनोज अडसुळ (अत्रे) याच्याविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ.दिपक प्रभाकर रासने(69,रा.तपोवन सोसायटी, पर्वती) यांचा मुलगा डॉ.साहिल याच्याविरुध्द ऑक्‍टोबर 2019 … Read more

बेकरीमालकाच्या निष्काळजीपणामुळे बाल कामगाराचा मृत्यू

बेकरीमालकाच्या निष्काळजीपणामुळे बाल कामगाराचा मृत्यू पुणे,दि.7 बेकरी मालकाच्या निष्काळजीपणामुळे बेकरी कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. शॉक लागल्यानंतर कामगाराला तातडीने रुग्णालयात न पोहचवता तसेच झोपून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलाउद्दीन अन्सारी(17) असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी शाहीद अब्दुलहक अन्सारी (52,रा.कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी … Read more