गुजरातमधील करोनास्थिती आणखी चिंताजनक

एकाच दिवसात 49 बाधितांचा मृत्यू अहमदाबाद : गुजरातमध्ये करोना फैलावाची स्थिती आणखी चिंताजनक बनली आहे. त्या राज्यात मंगळवारी बाधित आणि बळींच्या संख्येचा उच्चांक नोंदला गेला. गुजरातमध्ये दिवसभरात नवे 441 करोनाबाधित आढळले. त्यामुळे त्या राज्यातील बाधितांच्या संख्येने 6 हजारांचा टप्पा ओलांडला. गुजरातमध्ये करोनाने एकाच दिवसात 49 बाधितांचा बळी घेतला. त्यामुळे त्या राज्यातील मृतांचा आकडा 368 इतका … Read more

कर्जाचा हप्ता न देण्यास आणखी 3 महिन्याची मुदतवाढ शक्‍य

लॉक डाऊन वाढल्यामुळे कर्ज घेणाऱ्याची उलाढाल ठप्प मुंबई : केंद्र सरकारने लॉक डाऊन आणखी 2 आठवड्यानी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे आणि उद्योगांचे व्यवहार ठप्प राहणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना कर्ज परतफेडीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या शक्‍यतेवर रिझर्व बॅंक विचार करीत असल्याचे बोलले जात आहे. या अगोदर लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर अर्थमंत्रालयाने आणि … Read more

राज्यात मद्य विक्रीसाठी आता टोकन पद्धत

गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून नवी नियमावली मुंबई : राज्यात दिवसभरात सरासरी 17 कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील 42 ते 43 दिवस राज्यभरात दारूची दुकानं लॉकडाऊनमुळे बंद होती. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कालपासून दारू विक्रीचा निर्णय घेतल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. मात्र ही गर्दी जास्त दिवस राहणार नाही, आज किंवा उद्यापर्यंत … Read more

जगभरातील करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर

ब्रिटन बनले युरोपमधील उद्रेकाचे केंद्र लंडन : जगभरातील करोनाबळींची संख्या अडीच लाखांवर पोहचली आहे. त्या विषाणूने सर्वांधिक जीवितहानी अमेरिकेत झाली आहे. त्यापाठोपाठ ब्रिटनचा क्रमांक लागला आहे. त्यामुळे युरोप खंडातील करोना उद्रेकाचे केंद्र आता ब्रिटन बनल्याचे चित्र आहे. जगभरातील 212 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्याचा सर्वांधिक तडाखा अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील बाधित … Read more

जम्मू-काश्‍मीरमधील तीन छायाचित्रकारांना प्रतिष्ठेचा पुलित्झर

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील चन्नी आनंद, मुख्तार खान आणि डार यासीन या तीन छायाचित्रकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेकडून दिला जाणारा तो पुरस्कार फिचर फोटोग्राफी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठीचा आहे. पुलित्झरने सन्मानित केले जाणारे तिन्ही छायाचित्रकार असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेसाठी कार्यरत आहेत. मागील वर्षी ऑगस्टमध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्‍मीरचा विशेष … Read more

मुंबई, पुण्यात करोनामुक्‍त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक

राज्यात एकाच दिवशी 350 जण कारोनामुक्‍त – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : करोनाचे रुग्ण वाढत असताना काल दिवसभरात राज्यातील 350 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने एकाच दिवशी रुग्णांना घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसोबत रुग्णांच्या नातेवाईकांनाही दिलासा आणि धीर मिळाला आहे. राज्यात सर्वाधिक मुंबई मंडळात 228 … Read more

सोलापुरात करोना रुग्णांची वाटचाल दीड शतकाकडे

मंगळवारी पोलीस, लॅब असिस्टंटसह 10 जणांना संसर्ग सोलापूर : सोलापूर शहरांमध्ये करोना रुग्णांची वाटचाल आता दीड शतकाकडे सुरू झाली आहे. मंगळवारी एक पोलीस आणि एका रुग्णालयातील लॅब असिस्टंटसह शहर आणि ग्रामीण भागातील एकूण दहा जणांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले आहेत. ज्यामध्ये 5 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. सोलापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या आता 145 … Read more

करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 27.41 टक्के

नवी दिल्ली : देशात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 27 पूर्णांक 41 शतांश टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी आज ही माहिती दिली. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता 12 दिवसांपर्यंत वाढला आहे. देशभरात आज सकाळपासून 278 नवीन करोनाबाधित रूग्ण आढळून आले. त्यामुळे देशात आता करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या 46 हजार … Read more

भारतात 50 लाख नागरिक विस्थापित

संयुक्‍त राष्ट्र : भारतातील नैसर्गिक आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचारासारख्या आपत्तींमुळे 2019 या एकाच वर्षात तब्बल 50 लाख नागरिक देशांतर्गत अन्यत्र विस्थापित झाले आहेत. देशांतर्गत विस्थापित होणाऱ्यांची एक वर्षातील सर्वात जास्तीची आकडेवारी फिलीपाईन्स, बांगलादेश आणि चीनमधील आहे. त्यापाठोपाठ भारतात सर्वाधिक जास्त विस्थापित झाले असल्याचे संयुक्‍त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे. 2019 साली 3 कोटी 30 लाख … Read more

दारूची दुकाने सुरु झाल्याने महिला अत्याचारात वाढ

शिरूर : राज्य सरकारने आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी राज्यातील दारूच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दारूच्या दुकानासमोर मद्यप्रेमीच्या लांबच लांब रांगा दुसऱ्या दिवशी सुरु होत्या. परंतु सरकारच्या या निर्णयामुळे महिला वर्गांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. घरगुती हिंसाचार, आणि महिला वरील अत्याचार यांच्यात यामुळे वाढ होणार आहे. कालपासून दारूची दुकाने सुरू झाली आणि मद्यप्रेमींनी … Read more