जगदीप धनखड देशाचे 14 वे उपराष्ट्रपती; धनखड यांना 528 मते

नवी दिल्ली – केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) उमेदवार जगदीप धनखड यांची शनिवारी अपेक्षेप्रमाणे देशाच्या 14 व्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाली. आता 71 वर्षीय धनखड राज्यसभेच्या अध्यक्षपदाचीही सुत्रे स्वीकारतील. विद्यमान उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होणार आहे. त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्यासाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार केवळ राज्यसभा आणि लोकसभेच्या 780 खासदारांना … Read more

अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलियाची चीनला युद्धसराव ताबडतोब थांबवण्याची सूचना

फेनोम पेन्ह (कंबोडिया) – चीनने सुरू केलेला क्षेपणास्त्रांचा सराव ताबडतोब थांबवण्यात यावा, अशी सूचना अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यापासून चीनने तैवानच्या सामुद्रधुनीमध्ये क्षेपणास्त्रांच्या माऱ्याचा युद्धसराव सुरू केला आहे. त्यामुळे त्या भागात तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तैवानच्या सामुद्रधनीच्या परिसरात चीनची अनेक लढूा जहाजे आणि … Read more

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे मोदींना खरमरीत पत्र; म्हणाले…

हैदराबाद – “केसीआर” या नावाने ओळखले जाणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्याविषयीचा निर्णय त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र पाठवून कळवला. नीती आयोग ही यंत्रणाच निरूपयोगी असल्याची आक्रमक भूमिकाही केसीआर यांनी मांडली. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी देशाची राजधानी दिल्लीत नीती आयोगाची बैठक होणार आहे. बैठकीचे निमंत्रण सर्व … Read more

सीमेलगत चीनच्या हवाई कुरापतींबद्दल भारताकडून तीव्र आक्षेप; मांडली “ही” भूमिका

नवी दिल्ली – पूर्व लडाखजवळ सीमेलगत चीनच्या लढाऊ विमानांनी घिरट्या घातल्याच्या घटना मागील काही काळात घडल्या. त्या हवाई कुरापतींबद्दल भारताने चीनकडे तीव्र आक्षेप नोंदवला. भारत आणि चीनमध्ये नुकतीच लष्करी पातळीवर चर्चेची विशेष फेरी झाली. त्यावेळी चीनी विमानांच्या हालचालींचा मुद्दा भारताने उपस्थित केला. सीमेपासून 10 किलोमीटर अंतराच्या आत तशा हालचाली टाळायला हव्यात. कुठली अनुचित घटना टाळण्यासाठी … Read more

काश्‍मीरचा विषय शांततेने आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा चीनचा भारताला सल्ला

बीजिंग – “भारत आणि पाकिस्तानने काश्‍मीरचा विषय शांततेने आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवावा”, असे चीनने पुन्हा एकदा म्हटले आहे. जम्मू काश्‍मीरचा विशेष दर्जा रद्द केला गेल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनने हा सल्ला दिला आहे. जम्मू काश्‍मीर फेररचना विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेमध्ये आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले होते. हे विधेयक … Read more

संसेदतला कलगीतुरा बारामतीत रंगणार; खासदार सुळेंच्या मतदारासंघात “अर्थमंत्री’ मुक्कामी

पुणे (बारामती)  – महागाई आणि केंद्राशासनाच्या धोरणा विरोधात संसदेत बारामतीच्या खासदार सुप्रीया सुळे आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्यात शाब्दीक चकमक उडते. मात्र, हा संसदेत रंगणारा कलगीतुरा आता थेट बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात रंगणार असून भाजपकडून बारामतीच्या बालेकिल्लयात पवारांना आव्हान देण्यासाठी थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनाच उतरविण्यात आले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी … Read more

गोंदिया जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रकरणाची “एसआयटी”मार्फत होणार चौकशी

मुंबई – गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील “एसआयटी”मार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्‍या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाला त्यांचाच पक्षातील नेत्यांचा विरोध

कोलकाता – पश्‍चिम बंगालमध्ये 7 नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. त्यामुळे बंगालमध्ये 23 ऐवजी 30 जिल्हे होणार आहे. ममता ज्या प्रचंड बहुमताने राज्यात पुन्हा निवडून आल्या आहेत ते पाहता त्यांच्या या निर्णयाला कोणाचा विरोध होण्याची शक्‍यता नव्हती. विरोधी पक्षांकडेही त्यांना आव्हान देण्याइतपत संख्याबळ नाही. मात्र तरीही ज्या जिल्ह्यांतून … Read more

तीन शेतीविषयक कायद्यांनंतर आता शेतकरी संघटनांकडून अग्निपथ योजनेविरोधात एल्गार

नवी दिल्ली – देशातील 40 हून अधिक शेतकरी संघटनांची एक छत्री संघटना असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने रविवारी लष्कर भरतीच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशव्यापी निदर्शनांचे आयोजन केले आहे. माजी सैनिक युनायटेड फ्रंट आणि विविध युवा संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी शनिवारी सांगितले की, मोहिमेतील पहिले पाऊल म्हणजे 7 … Read more

“फुकटचे रेवडी वाटप”वरून भाजप खासदाराचाच मोदी सरकारवर हल्ला

नवी दिल्ली – देशात फुकटचे रेवडी वाटप धोरण परडणारे नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर भाजपचेच खासदार वरुण गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की, “मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत भ्रष्ट व्यावसायिकांचे तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. हे फुकटचे रेवडी वाटप नाही काय”, असा … Read more