३ वर्षीय बालिका बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी

नगर,दि.२३(प्रतिनिधी) – वरवंडीगांवात वेदीका श्रीकांत ढगे ही तीन वर्षाची बालिका बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. सकाळी आठ वाजता ही दूर्घटना घडली नेहमीप्रमाणे वेदीका सकाळी उठल्यावर अंगणात आली व खेळत बसली. घरातील सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. नजीकच्या गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने वेदीका वर हल्ला केला. घरातील सर्वांनी एकदमच आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या ने पलायन … Read more

ब्रेकिंग…शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवतेंवर अज्ञातांकडून हल्ला..

उत्कर्षा रूपवतेंवर अकोले येथे अज्ञातांकडून भ्याड हल्ला.. हाल्लेखोर पसार झालेला आहे. शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते हया आपले कार्यकर्ते व सहकाऱ्यांसमवेत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रचार दौरा आटपून परतत असताना अकोले येथून संगमनेरकडे येत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करत हल्ला केला.हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत. उत्कर्ष तिरुपती व त्यांच्या … Read more

ना आजी ना माजी उत्कर्षा रुपवते मारणार बाजी!

श्रीरामपूर – शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे ‘संविधान निर्धार सभा’ आयोजित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांचा झंझावाती प्रचार दवरा सुरु आहे. मतदार संघात त्यांना सर्व … Read more

नगरात घुमणार नमोचा नारा…

नगर, दि.२(प्रतिनिधी) – नगरकर ज्या सभेचे आतूरतेने वाट पाहत आहेत. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा येत्या ७ मे रोजी नगरमधील संत निरंकारी भवन जवळचे मैदान, सावेडी येथे सांयकाळी ४ वाजता पार पडणार आहे. अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली आहे. यामुळे नगरकरामध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये … Read more

सूज्ञ जनता विकास कामाला साथ देते, पोपटपंची करणाऱ्यांना नाही

श्रीगोंदा – अहिल्यानगर लोकसभा मतदार संघातील सूज्ञ असून, पाच वर्षात झालेली विकास काम जनतेच्या समोर आहे.त्यामुळे महायुतीलाच जनतेचे पाठबळ असल्याने पोपटपंची आणि भूलथापा देणाऱ्यांना थारा देणार नाही असा विश्वास खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. तालुक्यातील काष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा.विखे पाटील बोलत होते.माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित … Read more

आमदार राम शिंदे यांच कार्यकर्त्यांना ‘टॉनिक’

जामखेड –  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निवडणूक प्रचार नियोजना संदर्भात आमदार राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जामखेड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी राम शिंदे यांनी कार्यकर्यांत नवी ऊर्जा दिली आणि सुजय विखे पाटील यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. यामुळे … Read more

निवडणुकीच्या हंगामात नगरात सापडली बंदुकीच्या गोळ्यांची थैली..

नगर – नगर शहरातील उड्डाणपूलाखाली कोठी परिसरात बंदुकीच्या अनेक गोळ्या सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्या नगर शहरातील अहमदनगर पुणे संभाजीनगर महामार्गावर असलेल्या कोठी परिसरात सापडल्या आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या गोळ्या कुठून या … Read more

माळीवाडा बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत लागली आग

नगर – नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकासमोर असलेल्या उज्ज्वल कॉम्प्लेक्स इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बुधवारी (दि.६) दुपारी अचानक आग लागली. मैदानात असलेले वाळलेले गवत, कचरा यामुळे धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात दिसत होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. या आगीत फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. माळीवाडा बसस्थानकासमोर असलेल्या उज्वल … Read more

डॉ. ठाकूर यांच्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर – डॉक्टर ठाकूर नेक्सजेन मॅक्सिलोफेशियल इम्प्लांट अँड हेअर ट्रान्सप्लांट क्लिनिक यांच्या प्रथम वर्धापन दिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मोफत दंत व मुखरोग तपासणी शिबिरामध्ये सर्वयोगटातील जवळपास दीडशे रुग्णांनी लाभ घेतला. इतर मोठ्या शहरांमध्ये जी आत्याधुनिक उपचार पद्धती वापरली जाते तीच उपचार पद्धती श्रीरामपुरात मिळाल्यामुळे तसेच शिबिरामध्ये रुग्णांसाठी मोफत एक्स रे … Read more

श्री क्षेत्र तारकेश्वर गड, येथील दानपेटी चोरणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

पाथर्डी : श्री क्षेत्र तारकेश्वर गड दानपेटी चोरी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी ,संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे द्यावा,चोरी गेलेली दानपेटीतील रक्कम संबंधीत आरोपीकडून हस्तगत करावी अशी मागणी गडाच्या भाविकांनी बीडचे जिल्हा पोलीस प्रमुख नंदकुमार ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सात दिवसात यावर काही कारवाई न झाल्यास गडाच्या हजारो भक्तांना घेऊन आंदोलन करू असा … Read more