जगासमोरील शीतयुद्ध टाळावे; ग्युटेरेस यांचे चीन, अमरिकेला सूचना

संयुक्त राष्ट्र – अमेरिका आणि चीन या दोन बड्या देशांनी आपसातील संभाव्य शीतयुद्ध ठाळावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांनी केले आहे. या दोन देशांमधील बिघडलल्या संबंधांचा परिणाम अन्य देशांवर होण्याची शक्‍यता असल्याने अमेरिका आणि चीनने आपल्यातील संबंधांबाबत काळजी घ्यावी, असे ग्युटेरेस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.

 संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या नेत्यांची बैठक या आठवड्यात होणार आहे. त्यामध्ये कोविड-19, वातावरण बदल आणि अन्य वादग्रस्त विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ग्युटेरेस यांनी हे आवाहन केले आहे.

अमेरिका आणि चीनने वातावरण बदलाबाबत सहकार्य कराव. तसेच मानवी हक्क, अर्थकारण, ऑनलाईन सुरक्षा आणि दक्षिण चीन समुद्राच्या भागातील सौर्वभौमत्व या विषयांवरील सततचे राजकीय मतभेद दूर ठेवून व्यापार आणि तंत्रज्ञानविषयी वाटाघाटींची तयारी ठेवावी. दुर्दैवाने सध्या या सर्व विषयांवर आपल्याकडे केवळ मतभेदच आहेत, असेही ग्युटेरेस यांनी म्हटले आहे.

लसीकरणापुढील समस्या, वातावरण बदलापुढील समस्या आणि अन्य जागतिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी दोन्ही महत्वाच्या देशांमध्ये कृतीशील संबंध असणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायातील, प्रामुख्याने महासत्तांमधील विधायक संबंधांशिवाय या समस्या सोडवणे शक्‍य नाही, असे ग्युटेरेस म्हणाले.

जगाची विभागणी दोन भागात होत आहे. व्यापार, अर्थकारण, वित्तीय नियम, भूराजकीय आणि लष्करी धोरणांबाबत अमेरिका आणि चीनकडून प्रतिस्पर्धी गट उभे केले जात आहेत, असा इशारा ग्युटेरेस यांनी दोन वर्षांपूर्वी दिला होता. जगाची अशी विभागण होणे टाळायचे असेल, तर दोन्ही देशानी आपल्यातील संबंध दुरुस्त करावेत, असेही ते म्हणाले आहेत.