satara | अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर रस्त्याचे काम सुरू

पाचगणी, (प्रतिनिधी) – अवकाळी-क्षेत्र महाबळेश्वर या रस्त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून 35 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाचा शुभारंभ अवकाळी येथे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

राजपुरे म्हणाले, अवकाळीपासून क्षेत्र महाबळेश्वरला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. या रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. या रस्त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी 35 लाख रुपयांचा निधी दिला आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आमदार पाटील यांनी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासात कसलीही कसूर आम्ही ठेवलेली नाही. यावेळी अवकाळीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.