आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव स्पर्धेत 42 स्पर्धेकांना पारितोषिक

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात अविष्कार -2023 आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धेतील विविध गटातील विजेते 42 स्पर्धेकांना कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

अविष्कार – 2023 विद्यापीठस्तरीय संशोधन स्पर्धेत मानव्यविद्या भाषा व ललीतकला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, शेती आणि पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यक व औषध निर्माणशास्त्र या सहा संवर्गामध्ये एकूण 100 पेक्षा अधिक महाविद्यालयातील महाविद्यालयातील 456 पेक्षा अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत पदवीपूर्व (युजी)चे 239, पदव्युत्तर पदवी (पीजी) चे 187, निष्णात (पदव्युत्तर एम.फिल, पीएच.डी) चे 30 स्पर्धक सहभागी होते.

अशा प्रत्येक संवर्गातून सहभागी स्पर्धकांनी आपले संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण केले. परीक्षाणाअंती विविध गटातील एकूण 42 स्पर्धेकांची प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मनोजकुमार मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी पारिताषिक वितरणात वाणिज्य, व्यवस्थापन व विधी संवर्गात पदवी संवर्गात नाशिकचे मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपची पल्लवी पाटील यांनी प्रथम, नाशिकचे महात्मा गांधी विद्यामंदिरचे के.बी.एच. दंत महाविद्यालयाची श्रुती देशमुख यांनी व्दितीय तसेच नाशिकचे मोतिवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपची हर्षदा महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकविला आहे. तसेच पदव्युत्तर पदवी शाखेच्या मुंबईचे पी.डी. हिंदुजा कॉलेजचा अमंडा डिसुझा यांनी प्रथम, नागपूरचे व्हि.एस.पी.एम डेन्टल कॉलेज नागपूरचा चेतन पळसकर यांनी व्दितीय तसेच पुण्याचे धोंडूमामा साठे होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजची स्मिता गोंजारी यांनी तृतीय क्रमांक मिळाला आहे.