आयुष्मान भारत जगातील सर्वात मोठी योजना- मोदी

लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर आहेत. मोदी म्हणाले आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी योजना आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोकांनी आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

आयुष्मान भारत योजनेमुळे  देशातील सुमारे 70 लाख गरीब रूग्णांवर मोफत उपचार केले गेले असून त्यापैकी 11 लाख लोक उत्तर प्रदेशातील आहेत असेही ते म्हणाले. पुढे पंतप्रधान म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात केली जाणारी ही लाखो अभूतपूर्व कामे उत्तर प्रदेशातही दिसून येत आहेत. यावर्षी मुख्यमंत्री योगी सरकार आणि त्यांच्या टीमने एन्सेफलायटीसच्या चांगले काम केले आहे.

आज इथल्या प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे की स्वातंत्र्यानंतरच्या आम्ही जास्तीत जास्त भर अधिकारावर दिला आहे. आपल्या कर्तव्यावर,  आपण दिला पाहिजे ही आज काळाची गरज आहे असेही मोदी म्हणाले.

आरोग्य क्षेत्रासाठी सरकारचा योजना तैयार आहेत.  प्रथम – प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर काम करणे. द्वितीय- परवडणारी आरोग्य सेवा विस्तारित करणे. तिसरा – या क्षेत्रातील प्रत्येक मागणी लक्षात घेऊन पुरवठा सुनिश्चित करणे. चौथा – मिशन मोड हस्तक्षेप.

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, यूपीमध्ये ज्याप्रकारे सीएएच्या विरोधाच्या नावाखाली काही लोकांनी हिंसाचार केला, त्यांनी सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. त्यांनी स्वतःला एकदा विचरायला पाहिजे कि त्यांचा मार्ग योग्य आहे का? आपण हिंसाचारात मरण पावलेल्यांच्या कुटूंबाबद्दल आपण विचार केला पाहिजे.

 

Leave a Comment