आयुष्मान खुरानाने ‘ड्रीम गर्ल 3’ बाबत केला मोठा खुलासा, म्हणाला…

मुंबई – अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील आयुष्मानाने साकारलेल्या ‘पूजा’ नावाच्या भूमिकेचे देखील प्रचंड कौतुक करण्यात आले. या सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 88.91 कोटींची कमाई केली आहे. मात्र हा चित्रपट हिट होत असतानाच आयुष्मानने ‘ड्रीम गर्ल 3’ बाबत मोठे विधान केले आहे.

चित्रपटाच्या सिक्वेलबाबत आयुष्यमान म्हणाला की, “तुम्हाला तुमच्या आधीच्या चित्रपटात जे यश मिळालेले असतं तो बेंचमार्क असतो. तिथपर्यंत पून्हा पोहचणे महत्वाचे असते. मात्र तुम्ही त्याच्या 70 टक्के पर्यंत जरी पोहचला तरी पुरेसे आहे. त्यामुळे नक्कीच अपेक्षा आपल्याला एका नव्या सुरुवातीकडे घेऊन जाते. मला वाटतं की सिक्वेलप्रती लोकांच प्रेम नेहमीच कायम राहिल.”

यावेळी त्याने चित्रपट चांगला नसेल तर तो चालणार नाही हे देखील स्पष्ट केले. पुढे ‘ड्रीम गर्ल 3′ येणार का? हे दिग्दर्शक राज शांडिल्य सांगू शकतील. मी याबाबत मला माहित नाही’ असेही त्याने खुलासा केला. दरम्यान, ‘ड्रीम गर्ल 2’ ची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. ड्रीम गर्ल 2’ हा आयुष्मान खुरानाच्या 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सीक्वेल आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर दुसऱ्या भागात तिच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाची कथा करमाभोवती फिरते. जो मुलीचा आवाज काढण्यात माहीर आहे. पैसे कमावण्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो आणि पूजा म्हणून लोकांशी बोलतो. मात्र तिचा आवाज ऐकून अनेक लोक वेडे होतात.