बारामती : फिरत्या दवाखान्यात 250 जणांची आरोग्य तपासणी

बारामती – फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून तालुक्यातील ढेकळवाडी गावातील २५० नागरिकांची आज दि( 26 )रोजी आरोग्य तपासणी करण्यात आली.

हिराभाई बुटाला ट्रस्ट यांच्यातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मार्गद्शनाखाली उपक्रम राबविण्यात आला.

ऑक्सिजन, बी. पी.,शुगर व किरकोळ आजार व उपचार फिरत्या दवाखान्यात होणार झाले. २५० ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेत आरोग्य तपासणी करून घेतली.

यावेळी सरपंच सीमा झारगड, उपसरपंच शुभम ठोंबरे, सर्व सदस्य, माजी सरपंच बाळासो बोरकर, भालेराव झारगड, राहुल ठोंबरे, बुटला ट्रस्ट चे ड्रॉ आगवणे, ग्रामसेवक गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते पोपट पाटोळे, सुभाष सोलणकर, निलेश काळे, बंटी लकडे, आरोग्य अधिकारी डॉ ज्योती साळुंके, दिलावर शेख, आशा वर्कर, टकले, ठोंबरे, गरदडे आदी उपस्थित होते.