काळजी घ्या! पुरुषांनाच अधिक बाधा…

पुणे – एकूण बाधितांमध्ये पुरुषांची संख्या कायमच जास्त असून, बाधितांचा पुन्हा जो उद्रेक झाला आहे, त्यातही पुरुष बाधितांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

सुमारे 12 ते 15 फेब्रुवारी 2021 पासून बाधितांची संख्या वाढायला सुरुवात झाली. 1 ते 11 फेब्रुवारीदरम्यान 300 च्या आत बाधित आढळत होते, परंतु 12 फेब्रुवारीला बाधितांची संख्या 300 ने ओलांडली. या आठवड्यात फक्‍त 14 फेब्रुवारीला ती कमी होती. मात्र, 16 फेब्रुवारीनंतर ती 400 पार झाली. 22 फेब्रुवारीनंतर जो वेगाने उद्रेक झाला तो 600 च्या पुढे गेला आणि त्यानंतर 28 फेब्रुवारीपर्यंत 700च्याही पार गेला.

एक मार्च 2021 नंतर बाधितांची आकडेवारीने वेगच घेतला आणि 800, 900 आणि हजार पार संख्या गेली. आणखी काही दिवसांत ती आकडेवारी दोन हजारांच्या पुढे जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

दहा दिवसांतच 12 हजार 128 बाधित
1 ते 28 फेब्रुवारी या 28 दिवसांच्या कालावधीतील बाधितांची संख्या 11 हजार 460 होती. परंतु, 1 ते 10 मार्च या दहाच दिवसांत बाधितांचा उद्रेक झाला आणि 12 हजार 128 बाधित सापडले.

Leave a Comment